________________
६४
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
मागे डोक फोडतात, तेव्हा मग डॉक्टर बोलवावा लागतो. म्हणजे हे रागद्वेषाच्या आधीन आहे ना! व्यवहार, व्यवहार आहे असे समजले नाही म्हणूनच ना!
मुलांना रागवावे लागले, पत्नीला दोन शब्द सांगावे लागले तर नाटकीय भाषेत शांत राहून रागवायचे. नाटकीय भाषा म्हणजे काय की आतून शांतता ठेऊन बाहेर रागवायचे. याला म्हणतात नाटक!
१५. ते आहे घेणे-देणे, नातं नाही बायको-मुले जर आपली असतील ना, तर ह्या शरीराला खूप त्रास होत असेल तर त्यातून पत्नीने थोडा घेतला असता, 'अर्धांगिनी' म्हटली जाते ना! अर्धांगवायू झाला असेल तर मुलगा घेणार का? ते तर कोणी घेत नाही. हा तर सर्व हिशोब आहे! वडीलांपासून जेवढा तुमचा मागण्याचा हिशोब होता, तेवढाच तुम्हाला मिळतो.
एका मुलाला काहीही चुक नसतांना त्याची आई त्याला सारखी मारत राहते आणि एक मुलगा खूपच मस्तीखोर असेल, तरी सुद्धा त्याचे लाड करत राहते. पाचही मुले त्याच आईची असतात परंतु पाचहीसोबत वेगवगळे वर्तन करत असते, त्याचे कारण काय?
प्रश्नकर्ता : त्यात प्रत्येकाचा कर्म उदय वेग-वेगळा असावा?
दादाश्री : हा तर हिशोबच चुकता होत आहे. आईला पाचही मुलांवर सारखा भाव ठेवायला हवा, पण तो राहणार कसा? आणि मग मुले म्हणतात, माझी आई त्याचीच बाजू घेत असते. अशी तक्रार करतात. ह्याचीच भांडणं आहे ह्या जगात.
प्रश्नकर्ता : तर त्या आईला त्या मुलावर असा वैरभाव का होत असतो ?
दादाश्री : आईचे काही पूर्वजन्मीचे वैर आहे. दुसऱ्या मुलासोबत पूर्वजन्मीचा राग (आसक्ति, मोह) आहे. म्हणून राग करीत असते. लोक न्याय शोधायला जातात की पाचही मुले तिच्यासाठी सारखी का नाहीत ?