________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
नंतर मुलगी जन्माला आली होती. तिला सुद्धा सन्मानपूर्वक बोलविले आणि सन्मानपूर्वक निरोप दिला. ह्या जगात जे येत असतात, ते सगळे जात ही असतात. त्यानंतर कोणी नाही, मी आणि हीराबा (दादाजींच्या धर्मपत्नी) आम्ही दोघेच आहोत.
६२
(१९५८ मध्ये) ज्ञान होण्या अगोदर हीराबा म्हणायच्या, ‘मुलं मरून गेलीत आणि आता आमची मुलं नाही, तर काय करायचे आपण ? वृद्धापकाळी आपली सेवा कोण करणार ?' त्या सुद्धा चिंतीत झाल्या होत्या! नाही का होणार चिंतीत ? तेव्हा मी त्यांना समजावले, 'आजकालची मुले दमछाक करतील तुमचा. मुले दारू पिऊन येतील तेव्हा तुम्हाला बरे वाटेल?' तेव्हा त्या म्हणाल्या, 'नाही ते तर बरे वाटणार नाही.' मग मी सांगितले, हे आले होते ते गेलेत, म्हणून मी पेढे वाटलेत. त्यानंतर जेव्हा हीराबांना अनुभव झाला, तेव्हा मला सांगायला लागल्या, ‘सगळ्यांचीच मुले खूप दुःख देत असतात. ' तेव्हा मी सांगितले, 'आम्ही तर आधीच सांगत होतो, परंतु आपण मानत नव्हत्या ! '
जे परके आहे, ते कधी आपले होत असतात का ? उगीच हायतोबा का करायची. एक तर हे शरीरच परके आहे, आणि ह्या शरीराचे ते परत नातलग ! हे शरीर परके आणि ह्या परक्याची ही सर्व संपत्ती. ही कधी आपली होऊ शकते ?
प्रश्नकर्ता : एकच मुलगा आहे, तो पण आमच्यापासून वेगळा झाला आहे, काय करायचे ?
दादाश्री : ते तर तीन असतील तरी वेगळे होतात आणि जर ते वेगळे नाही झाले तरी आपल्याला तर जावे लागेल. मग ते जरी एकत्र राहत असतील तरीपण एके दिवशी आपल्याला सर्व काही सोडून जावे लागेल. सोडून जावे नाही लागणार ? तर मग हायतोबा कशासाठी ? मागच्या जन्माची मुले कुठे गेलीत? मागच्या जन्माची मुले कुठे राहत असतील ?
प्रश्नकर्ता : ते तर ईश्वरलाच माहीत !
दादाश्री : घ्या! मागच्या जन्माच्या मुलांचे माहित नाही, ह्या जन्मातील मुलांचे परत असे झाले. ह्या सर्वांचा अंत कधी येईल ? मोक्षात जाण्याचे