________________
६०
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
शांती द्यावी. जो गेला तो गेला. त्याची आठवण करणे सुद्धा सोडून द्या. येथे जे हयात आहेत, जेवढे आपल्या आश्रित आहेत, त्यांना शांती द्या, एवढेच आपले कर्तव्य. हे तर गेलेल्यांची आठवण काढतात आणि येथे हयात असलेल्यांना शांती देत नाही, हे कसे? म्हणजे तुम्ही तुमचे सर्व कर्तव्य चुकत आहात. तुम्हाला हे कळते का? गेला तो गेला. खिशातून लाख रूपये कुठे तरी पडून गेले आणि नंतर ते मिळाले नाही तेव्हा आम्ही काय करायला हवे? तर काय डोके फोडायचे?
प्रश्नकर्ता : विसरून जायचे.
दादाश्री : हो, अर्थात हा सर्व असमंजसपणा आहे. खरोखर तर आपण वडील-मुलगा कोणत्याही प्रकारे नाही आहोत. मुलगा मरून गेला तर त्यात चिंता करण्यासारखे काहीच नाही. खरोखर तर संसारात चिंता करण्यासारखे जर काही असेल तर ते आई-वडीलांचा मृत्यु झाला तरच मनात चिंता व्हायला हवी. मुलगा मरून गेला तर मुलाबरोबर आपले काय घेणे-देणे? आई-वडीलांनी तर आपल्यावर उपकार केले होते. आईने तर आपल्याला नऊ महिने पोटात सांभाळले, मग मोठे केले. वडीलांनी शिक्षणासाठी फी दिली, सर्वच काही दिले.
आपणास माझे बोलणे समजते ना? म्हणून आता जेव्हा आठवण आली तेव्हा एवढे बोला ना की, 'हे दादा भगवान, हा मुलगा आपणास स्वाधीन केला!' यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या मुलाची आठवण करुन त्याच्या आत्म्याचे कल्याण होवो असे मनात बोलत रहा, डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचे. तुम्ही तर जैन थिओरी (सिद्धांत) समजणारे मनुष्य आहात. तुम्हाला तर माहित आहे की कोणाचे निधन झाल्यानंतर अशी भावना करायला पाहिजे की, त्याच्या आत्म्याचे कल्याण होवो! हे कृपाळुदेव त्यांच्या आत्म्याचे कल्याण करा.' त्याऐवजी आपण मनात कमकुवत होतो हे तर योग्य नाही. आपल्याच नातलगांना दुःखात टाकायचे हे आपले काम नाही. तुम्ही तर समजदार, विचारशील आणि संस्कारी लोक आहात, म्हणून जेव्हा-तेव्हा मृत मुलाची आठवण आली तेव्हा असे बोला की, त्याच्या आत्म्याचे कल्याण होवो! हे वीतराग भगवान, त्याच्या आत्म्याचे कल्याण करा.' असे बोलत राहायचे. कृपाळुदेवाचे नांव घेणार, किंवा दादा भगवान