________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
५९
तरीही सांगतात की मला मुले नाहीत, वेड्या मुलांचे करायचे तरी काय आहे? अशी मुले जी त्रास देणारी असतील ती काय कामाची? त्याऐवजी तर शेर माती (मुल) नसलेली बरी. आणि कोणत्या जन्मात तुला शेर माती नव्हती? आता हा मनुष्य जन्म मोठ्या कष्टाने मिळाला आहे, तर मुर्खा, इथे तर सरळपणे रहा ना! आणि काही मोक्षचे साधन शोधून काढ आणि आपले काम साधून घे.
प्रश्नकर्ता : मागच्या वर्षी यांचा मुलगा मरून गेला, तेव्हा त्यांना खूप दुःख झालेले आणि मानसिक रित्या खूप सहन करावे लागले होते. तर सांगतातकी आम्हाला असे जाणून घ्यायची इच्छा होते की मागच्या जन्मात आम्ही असे काय केले असेल, की ज्यामुळे असे घडते ?
दादाश्री : त्याचे असे आहे की, ज्याचा जेवढा हिशोब असेल तेवढेच ते आपल्या सोबत राहते, हिशोब पूर्ण झाल्या बरोबर आपल्या वहीखात्यामधून वेगळा होऊन जातो. बस एवढाच त्याचा नियम आहे.
प्रश्नकर्ता : काही मुले जन्मल्याबरोबर लगेचच मरतात, तेव्हा काय त्यांचे तेवढेच घेणे-देणे होते?
दादाश्री : आई-वडीलांसोबत जेवढा राग-द्वेषाचा हिशोब आहे, तेवढा पूर्ण झाला, म्हणून आई-वडीलांना रडवून जातो, खूप रडवतो, आईवडील डोके सुद्धा फोडतात. मुलगा डॉक्टराचा खर्च पण करायला लावतो, सर्व काही करायला लावतो आणि नंतर तो निघून जातो.
बाळाच्या मृत्युनंतर त्याच्यासाठी चिंता केल्याने त्याला दुःख होते. आपले लोक अज्ञानतामुळे असे सर्व करतात. म्हणून तुम्ही जसे आहे तसे यथार्थपणे समजून शांतीपूर्वक रहायला पाहिजे. नंतर विनाकारण डोकेफोड करणे त्याला काय अर्थ आहे?
___ मुलं कुठे नाही मरत? हे तर संसारिक ऋणानुबंध आहे. घेण्यादेण्याचा हिशोब आहे. आमचे सुद्धा मुलगा-मुलगी होते, पण ते मरून गेले. पाहूणे आले होते ते पाहूणे गेलेत, ते आपले कुठे आहेत? आम्हाला सुद्धा एक दिवस नाही जायचे का? तर आता जे जिवंत आहेत त्यांना आपण