________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
सेफ साइड (सुरक्षीतता) करुन घेतलेली बरी. प्रत्येक दिवसाची सेफ साइड करणे चांगले. पुढचे विचार जे करतात ते विचार कोणत्याही प्रकारे 'हेल्पिंग' (सहाय्यक) नाहीत, परंतु नुकसानकारकच आहे. त्याऐवजी आपण प्रत्येक दिवसाची सेफ साइड करीत रहायचे हाच सर्वात उत्तम उपाय आहे.
५७
तुम्हाला मुलां-मुलींचे पालक होऊन, ट्रस्टी होऊन रहायचे आहे. त्यांच्या लग्नाची चिंता करायची नाही कारण ते आपला हिशोब घेऊन आलेले आहेत. मुलीच्या बाबतीत तुम्हाला चिंता करायला नको. मुलीचे तुम्ही पालक आहात. मुलगी स्वतः साठी मुलगा सुद्धा घेऊन आलेली असते. आम्हाला कोणाला सांगायला जाण्याची आवश्कता नाही की आमची मुलगी आहे, तिच्यासाठी मुलाला जन्म द्या. असे सांगायला जावे लागते का ? अर्थात् ती आपले सर्व काही घेऊनच आलेली असते. तेव्हा वडील सांगतात, 'ही पंचवीस वर्षाची झाली, पण अजून तिचे लग्न जुळत नाही, असे, तसे, ' दिवसभर गात रहातात. अरे ! तिकडे मुलगा सत्तावीस वर्षाचा झाला आहे पण तुला भेटला नाही, कशाला बोंबाबोंब करतोस ? झोपून जा ना शांतपणे'! मुलगी आपली काळ-वेळ सर्व निश्चित करुनच आलेली आहे.
चिंता केल्याने तर उलट अंतराय कर्म बांधले जातात, त्या कार्याला विलंब होतो. आपल्याला कोणी सांगितले असेल की अमक्या ठिकाणी एक मुलगा आहे, तर आपण प्रयत्न करायचे. भगवंतांनी चिंता करण्यास मनाई केली आहे. चिंता केल्याने तर अंतरायात भर पडत असते. आणि वीतराग भगवानांनी तर काय सांगितले आहे की, 'तुम्ही चिंता करत राहता तर तुम्हीच मालक आहात का ? तुम्हीच जग चालवित आहात का ?' तसे पाहिले तर लक्षात येईल की आपल्याला तर संडास जाण्याची सुद्धा स्वतंत्र शक्ति नाही. ते जर बंद होऊन गेले तर डॉक्टरांना बोलवावे लागते. तोपर्यंत असे वाटते की ही शक्ति आमची आहे, परंतु ही शक्ति आमची नाही आहे. ही शक्ति कोणाच्या आधीन आहे हे जाणून घ्यायला नको ?
हे तर शेवटच्या घटकेला खाटेवर पडलेले असतानाही, लहान मुलीची चिंता करत राहतो की, हिचे लग्न लावायचे राहून गेले. अशा चिंतेत आणि चिंतेतच मरून गेला तर मग पशू योनीत जन्म घेणार. पशूयोनीत जन्म