________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
मग त्या मुलासाठी चिंता होईल का? ममता सुटली की चिंता पण सुटते. म्हणेल आता तो मुलगा मला नकोच. ही चिंता होत असते, ती ममतावाल्यांना होत असते.
त्याचा साडू आजारी असेल ना, तर बारा वेळा हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो आणि वडील आजारी असेल तेव्हा तीनच वेळा भेटायला जाणार. अरे मेल्या, असे तू कोणत्या चावीच्या आधारावर करतोस? घरात पत्नी चावी मारते, की 'माझ्या मेहुण्यांना भेटून या.' म्हणजे पत्नीने चावी मारली की लगेच तयार! असे पत्नींच्या आधीन आहे हे जग.
तसा तर मुलगा चांगला असतो, परंतु जर त्याला गुरु (पत्नी) मिळणार नसेल तर. पण गुरू मिळाल्याशिवाय रहात नाही ना! मला काय म्हणायचे आहे की मग गुरु परदेशी असो की इन्डियन असो, पण ती आल्यानंतर आपल्या हातात लगाम (काबू) रहात नाही. म्हणून लगाम पद्धतशीर आपल्या हातात ठेवायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : मागील जन्मात कोणाशी वैर बांधले असेल, तर ते कोणत्या न कोणत्या तरी जन्मात त्यास भेटून फेडावे लागते ना?
दादाश्री : नाही, असे नाही आहे. अशा प्रकारे वैर संपत नाही. वैर बंधनाने आतमध्ये राग-द्वेष होतात. मागील जन्मात मुलासोबत वैर बांधले गेले असेल तर आपल्याला विचार येतात की कोणत्या जन्मात पूर्ण होईल ? अशा प्रकारे मग आम्ही केव्हा एकत्र येऊ? तर तो मुलगा ह्या जन्मात मांजर होऊन येईल. तुम्ही त्याला दूध दिले तर तो तुमच्या तोंडावर पंजा मारेल! असे तुमचे वैर चुकते होत असते. तर असे आहे हे सर्व! परिपाक होणे हा काळाचा नियम आहे म्हणून थोड्या अवधीत हिशोब पूर्ण होऊन जातो. काही जण वैरभावा ने भेटत असतात. समजा असा मुलगा भेटला तर तो वैरभावाने पिळून तेल काढेल आपले. समजले का? शत्रूभावाने आला तर असे होईल की नाही?
प्रश्नकर्ता : मला तीन मुली आहेत, त्यांच्या भविष्याबाबत मला त्यांची चिंता वाटत असते.
दादाश्री : आपण भविष्याच्या बाबतीत विचार करण्यापेक्षा आजची