________________
५
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
मुलगा शोधून आणा की ज्याच्यावर वडील तीन तास रागवले त्यानंतर सुद्धा तो म्हणेल की, 'हे पूज्य पिताश्री, तुम्ही कितीही रागावले तरी सुद्धा तुम्ही आणि मी एकच आहोत.' असे बोलणारा शोधून आणाल? हे तर अर्धा तास 'टेस्ट' (परीक्षा) वर घेतले असेल तर फुटून जाईल? बढुंकीतील टिकली फुटायला वेळ लागेल, परंतु हा तर लगेच फुटतो. थोडेसे रागविण्यास सुरू केले, तर त्या अगोदरच फुटतो की नाही?
मुलगा 'पप्पाजी, पप्पाजी' करत असेल तेव्हा कडू लागले पाहिजे. जर गोड लागले तर ते सुख उधार घेतले असे होईल. मग ते दुःखाच्या रूपात परत करावे लागेल, मुलगा मोठा झाल्यावर तुम्हाला म्हणेल की, तुम्ही तर बिन अक्कलेचे आहात.' तेव्हा तुम्हाला वाटेल की हे असे कसे झाले? तुम्ही जे उधार घेतले होते, ते तो वसुल करतो आहे. म्हणून आधीपासूनच सतर्क व्हा. आम्ही तर उधारीचे सुख घेण्याचा व्यवहारच सोडून दिला होता. अहो! स्वत:च्या आत्मामध्ये अनंत सुख आहे ! त्याला सोडून ह्या भयंकर घाणीत का पडायचे?
एक सत्तर वर्षाची म्हातारी होती. एके दिवशी घराबाहेर येऊन आरडा-ओरड करायला लागली, 'जळो हा संसार, कडू विषासारखा, मला तर इतका सुद्धा आवडत नाही! हे भगवंता, मला उचलून घे.' तेव्हा एक मुलगा रस्त्याने जात होता तो म्हणाला, 'काय आजी दररोज तर चांगला म्हणत होती, दररोज तर गोड द्राक्षासारखा लागत होता आणि आज कडू कसा झाला?' तेव्हा म्हणायला लागली, जळो, माझा मुलगा माझ्याशी भांडतो. ह्या म्हातारपणी मला म्हणतो, 'चालती हो येथून.'
पूर्वी उपकारी शोधायला बाहेर जावे लागत होते आणि आज तर उपकारी घरच्या घरीच जन्मले आहेत. म्हणून मुलगा जे काही देतो आहे ते शांतपणे स्विकारायचे.
महावीर भगवनांना सुद्धा उपकारी मिळत नव्हते. आर्य देशात उपकारी मिळाले नाही त्यामुळे तर त्यांना मग साठ मैल दूर अनार्य देशात जावे लागले होते, आणि आम्हाला घरी बसल्या उपकारी मिळाले आहेत. मुलगा म्हणतो, 'आम्हाला उशीर झाला तर कटकट करायची नाही. तुम्हाला