________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
बॅन्केतून कर्ज काढून द्यायचे. म्हणजे पंचवीस हजाराचे कर्ज बॅन्केतून, काढ आणि ह्या कर्जाचे हप्ते तू भरत जा, असे त्याला सांगायचे, मुलगा हप्ते भरत राहतो आणि तो समंजसही होतो नंतर.
म्हणून मुलास रीतसर पद्धतीशीर जेवढे द्यायला हवे तेवढे देऊन, बाकी सगळे लोकांच्या सुखासाठी चांगल्या मार्गी वापरायचे. लोकांना सुख केव्हा वाटेल? जेव्हा त्यांच्या हृदयाला गारवा पहोचेल तेव्हा! तर ही संपत्ती तुमच्या सोबत येईल. अशी रोकड नाही येत परंतु ओवरड्राफ्टच्या (जमाराशीच्या) रूपात येत असते. रोकड तर सोबत नेऊ देतच नाही ना! येथे अशा प्रकारे जमाराशी बनवा, लोकांना खायला द्या, सगळ्यांच्या हृदयाला गारवा पोहचवा. कोणाला अडी-अडचणीत मदत करा. हा मार्ग आहे पुढे ड्राफ्ट पाठवण्याचा. अर्थात् पैसाच्या सदुपयोग करा. चिंता करु नका. खायचे-प्यायचे, खाण्या-पिण्यात कंजूशी करु नका. म्हणून मी सांगत असतो की, ' वापरुन टाका आणि जमाराशी बनवा.'
मी त्याच्या मुलांना विचारले की ही सर्व संपत्ती तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठीच जमविली आहे, तोकडे धोतर नेसून (कंजूशी करुन). तेव्हा ते म्हणाले, 'तुम्ही आमच्या वडिलांना ओळखत नाही.' मी विचारले 'ते कसे?' तेव्हा ते म्हणाले, 'जर येथून पैसे सोबत नेऊ शकले असते ना, तर आमचे वडील तर लोकांकडून उसणे घेऊन दहा लाख सोबत घेऊन गेले असते असे पक्के आहेत. त्यामुळे ही गोष्ट मनात ठेवण्यासारखी नाही आहे.' त्या मुलानेच मला ही समज दिली. मी म्हणालो की, आता मला खरी गोष्ट समजली!' मला जे जाणायचे होते ते मला कळाले.'
___ एकुलता एक मुलगा असेल, त्याला वारस करुन सर्व सोपवून दिले. म्हणाले, 'बेटा, हे सर्व तुझेच आहे, आता आम्ही दोघे धर्माचे करू.' 'आता ही सर्व संपत्ती त्याचीच तर आहे', असे बोलतात तर फजिती होईल. कारण की, त्याला सर्व संपत्ती देऊन टाकल्याने काय होईल? वडीलांनी सर्व संपत्ती एकुलत्याएक मुलास देऊन टाकली तर मुलगा आई-वडिलांना काही दिवस सोबत ठेवेल परंतु एके दिवशी मुलगा म्हणेल, 'तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही असे एका जागी बसून रहातात येथे.' तेव्हा मग वडिलांच्या मनात असे येते की मी याच्या हाती लगाम