________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
११. वारसा हक्काप्रमाणे मुलांचे किती? प्रश्नकर्ता : पुण्योदयाने गरजे पेक्षा जास्त लक्ष्मी प्राप्त झाली तर?
दादाश्री : तर सत्कार्यासाठी वापरून टाकायची. मुलांसाठी जास्त ठेऊ नका. त्यांना शिकवायचे, घडवायचे हे सर्व करुन सर्व्हिसला लावायचे, अर्थात मग ते त्यांच्या कामाला लागले, म्हणजे जास्त ठेऊ नका. एवढे लक्षात ठेवायचे की, जेवढे आपल्यासोबत येईल तेवढेच आपले.
प्रश्नकर्ता : हा भाऊ, येथून सोबत काही घेऊन जाऊ शकणार आहे का?
दादाश्री : आता काय घेऊन जाणार? त्याच्या जवळ जे होते ते सर्व येथे येऊन खर्च करुन संपवून टाकले. आता मोक्षासाठी येथे येऊन माझ्याकडून काही मिळवले तर जीवन सुधरेल. अजून आयुष्य उरले आहे. अजूनही जीवनात फेरफार कर. जागे झाले तेव्हापासून सकाळ.
पुढच्या जन्मात सोबत घेऊन जाण्यासाठी कोणती वस्तु आहे? येथे तुम्ही जे खर्च केले ते सर्व गटारात गेले, तुमच्या मौजमजेसाठी, तुमच्या रहाण्यासाठी जे पण केलेत ते सर्व गटारात गेले. फक्त दुसऱ्यांसाठी जे काही केले तेवढाच तुमचा ओवरड्राफ्ट (जमा) आहे.
एका माणसाने मला प्रश्न केला की मुलांना काहीच द्यायचे नाही? मी सांगितले, 'मुलांना द्यायचे, तुमच्या वडीलांनी तुम्हाला जेवढे दिले असेल तेवढे सर्वच द्यायचे. मधला, जो तुम्ही कमवलेला माल आहे तो तुम्हाला योग्य वाटेल तेथे धार्मिक-कार्यात वापरुन टाका.'
प्रश्नकर्ता : आपल्या वकिलांच्या कायद्यात पण असेच आहे की वडिलोपार्जित प्रोपर्टी (संपत्ती) असेल, ती मुलांना द्यायलाच पाहिजे आणि स्वत:कमवलेल्या संपत्तीचा वापर बापाला जसा करायचा असेल तसे करु शकतो.
दादाश्री : होय, जे करायचे असेल ते करु शकता, आपल्या हातानेच करायचे. आपला मार्ग काय सांगतो की तुझा स्वत:चा माल असेल तो वेगळा करुन वापर, तर तो तुझ्यासोबत येईल. कारण की हे 'ज्ञान' प्राप्त केल्यानंतर