________________
४८
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
१०. शंकांचे शूळ एक माणूस माझ्याकडे येत असे. त्याला एक मुलगी होती. मी त्याला सुरुवातीलाच समजावले होते की, 'हे तर कलियुग आहे, ह्या कलियुगाचा परिणाम मुलींवर सुद्धा होत असतो. म्हणून सावध रहायचे.' तो माणूस समजून गेला आणि जेव्हा त्याची मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली, तेव्हा त्या माणसाने माझी आठवण काढली आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, 'आपण सांगितलेली गोष्ट खरी होती. जर आपण मला ती गोष्ट सांगितली नसती तर मला विष प्यावे लागले असते.' असे आहे हे जग, पोलंपोल! जे घडेल ते स्विकारायचे, त्यासाठी काय विष प्यायचे? नाही, मुर्खा तू वेडा ठरशील. हे तर कपडे झाकून अब्रू सांभळतात आणि सांगतात की आम्ही खानदानी आहोत.
एक आमचा जवळचा नातलग होता, त्याच्या चार मुली होत्या. तो खूप जागृत होता, मला सांगायचा, 'ह्या मुली मोठ्या झाल्या आहेत, कॉलेजला जातात, परंतु माझा त्यांच्यावर विश्वास बसत नाही.' त्यावर मी त्याला सांगितले, सोबत जा, 'कॉलेजला सोबत जात जा आणि त्या कॉलेजमधून निघाल्या की त्यांच्या मागे मागे जायजे.' अशाप्रकारे एक वेळा जाशील परंतु दुसऱ्यावेळी काय करशील? बायकोला पाठवशील? अरे, विश्वास कुठे ठेवायचा आणि कुठे नाही ठेवायचा, एवढे सुद्धा कळत नाही? आपण मुलींना एवढे सांगून द्यायचे की, 'पहा मुलींनो, आपण चांगल्या घरची माणसं आहोत, आपण खानदानी, कुलवान आहोत.' अशा प्रकारे त्यांना सावधान करायचे. नंतर मग जे घडेल ते 'करेक्ट', त्यावर शंका नाही करायची. शंका घेणारे किती असतील? जे ह्या बाबतीत जागृत असतात ते शंका करतात. असा संशय घेत राहिल्यास कधी पार येईल?
म्हणून कोणत्याही प्रकारची शंका होत असेल तर ती उत्पन्न होण्याच्या ओगदरच उखडून फेकून टाकायची हे तर मुली बाहेर फिरण्यास जातात, खेळायला जातात, त्यात सुद्धा शंका घेतात आणि शंका उत्पन्न झाली तर आपले सुख-चैन टिकून राहते का?
जर कधी मुलगी रात्री उशीरा घरी आली तरी पण शंका घेऊ नका.