________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
आल्यावर त्याला सोबत ठेवाल तर तो सदैव पत्नीचे सांगितलेलेच ऐकेल, तुमचे ऐकणार नाही. त्याची बायको सांगेल, आज 'आई अशा म्हणत होत्या, नि तशा म्हणत होत्या.' तेव्हा मुलगा म्हणेल, 'होय, आई तशीच आहे.' आणि मग आले तुफान. दूरूनच सगळे चांगले राहते.
प्रश्नकर्ता : मुले परदेशात आहेत त्यांची आठवण येत असते, त्यांची चिंता ही होते.
दादाश्री : ही मुले तर तेथे खाऊन-पिऊन मजा करीत असतील, आईची आठवण सुद्धा करीत नसतील आणि आई येथे चिंता करीत राहते, ही कशी गोष्ट?
प्रश्नकर्ता : मुले तेथून लिहितात की तू येथे ये.
दादाश्री : हो, पण जायचे काय आपल्या हातात आहे? त्याऐवजी आपणच जसे आहे तसे समाधान करुन घ्यायचे. त्यात काय चुकीचे आहे? ते त्यांच्या घरी, आपण आपल्या घरी! आपल्या पोटी जन्म घेतला म्हणून काय ते सगळे आपले झालेत? आपले असतील तर आपल्या बरोबर येतील परंतु येते का कोणी ह्या जगात?
घरात पन्नास व्यक्ती असतील, परंतु आपल्याला ओळखता येत नाही म्हणून मतभेदाने क्लेश होत राहणार. त्यांना ओळखायला पाहिजे ना? हे गुलाबाचे रोप आहे की कोणते रोप आहे, हे शोधायला नको का?
पुर्वी काय होते? एका घरात सगळे गुलाब आणि दुसऱ्या घरात सगळे मोगरा, तिसऱ्या घरात चंपा! आता काय झाले आहे की, एका घरात मोगरा आहे, गुलाब आहे, चंपा आहे! गुलाब आहे तर काटे असणारच आणि जर मोगरा असेल तर काटे नसणार, मोगऱ्याचे फूल पांढरे असेल, गुलाबाचे गुलाबी असेल, लाल असेल. ह्या काळात अशी वेगवेगळी रोपे एकत्री आली आहेत. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का.
सत्युगात जे शेत होते, आज कलियुगात ते बगीच्या सारखे होऊन गेले आहे ! परंतु त्याला पहाता येत नाही, तर काय होणार? ज्याला योग्य प्रकारे पहाता आले नाही तर त्यास दुःख होणारच ना? लोकांना असे