________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
४५
पण उलट ते शब्द परत येतात. आपण तर मुलांना खाण्या-पिण्याचे बनवून द्यायचे आणि आपले कर्तव्य निभावयाचे, दुसरे काही बोलण्यासारखे नाही आहे. बोलण्याचा फायदा नाही असे तुम्हाला वाटते? असा तुमचा निष्कर्ष निघतो? मुले आत्ता मोठी झालीत, ती काय शिडी वरून पडतील? तुम्ही तुमचा आत्मधर्म का चुकता आहात? ह्या मुलांसोबतचा तर रिलेटिव धर्म आहे. तेथे व्यर्थ डोकेफोडी करण्यासारखी नाही आहे, क्लेश करण्याऐवजी मौन राहणे उत्तम होईल. क्लेशमुळे स्वतःचेही बिघडते आणि समोरच्याचेही बिघडते.
ते तुम्हाला वाईट बोलतील, तुम्ही त्याला वाईट बोलणार! मग वातावरण दुषित होते आणि भडका उडतो. म्हणून तुम्ही त्याला चांगले म्हणावे, कोणत्या दृष्टीने तर एक दृष्टी मनात पक्की करा. की 'आफ्टर ऑल ही इज ए गुड मॅन' (शेवटी तर तो चांगला माणूस आहे.)
प्रश्नकर्ता : संघर्ष होतो तेव्हा मुलांसोबत कसे वागायला हवे?
दादाश्री : राग-द्वेष व्हायला नको. त्याने काही बिघडविले असेल, किंवा काही नुकसान केले असेल तरी सुद्धा त्याच्यावर द्वेष होऊ देऊ नका. आणि त्याला 'शुद्धात्मा' या रूपात पहा. बस. अर्थात् राग-द्वेष झाला नाही तर सर्व निरसन होऊन गेले आणि आपले ज्ञान राग-द्वेष होऊ देत नाही असे आहे.
आपल्या मनामध्ये थोडीशी पण द्विधा असेल तर ती आपली स्वत:चीच आहे, दुसऱ्या कोणाचीच नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. द्विधावस्था का झाली? आम्हाला पाहता नाही आले त्यामुळे. आम्ही 'शुद्धात्मा'च पहायचा आहे. सर्व द्विधा संपवायच्या आहेत 'मी शुद्धात्मा आहे,' बाकी सर्व ** व्यवस्थित शक्ति' आहे. असे 'सॉल्युशन (उपाय) मी दिले.'
मुलाचे लग्न झाल्यावर सून अल्यानंतर कंटाळून जावून चालणार नाही, म्हणून आधीच सावध व्हा. एकत्र राहणार तर क्लेश होणार. त्यामुळे त्याचे जीवन बिघडेल आणि त्यासोबत आपलेही बिघडवेल. जर प्रेम मिळवायचे असेल तर त्याला वेगळे राहू द्या आणि प्रेम जपा, नाहीतर आयुष्य बिघडवून घ्याल आणि त्यामुळे प्रेम सुद्धा घटेल. त्याची पत्नी *व्यवस्थित शक्ति = रीझल्ट ऑफ सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स. म्हणजेच वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होवून आलेला परिणाम...