________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
४७
पहाण्याची दृष्टीच नाही. कोणीही वाईट नसते. हे मतभेद तर आपआपला अहंकार आहे. पहाता येत नाही त्याचे अहंकार आहे. पहाता आले असते तर दु:ख झाले च नसते! मला संपूर्ण जगात कोणासोबतही मतभेद होत नाहीत. मला पहाता येते की हा गुलाब आहे की मोगरा आहे. हा धतूरा आहे की कडू शिराळीचे चे फूल आहे, असे सगळ्यांना ओळखतो.
ह्या प्रकतिला ओळखता येत नाही म्हणून मी पुस्तकात लिहले आहे, 'घर हे बगीचा झाले आहे, म्हणून काम साधून घ्या, ह्या काळात.' जो स्वतः 'नोबल' (उदार) असेल आणि मुलगा कंजूष असेल तर म्हणेल, 'माझा मुलगा खूपच कंजूष आहे.' त्याला तू मारपीट करुन 'नोबल' करू पहातो पण तसे नाही होणार. त्याचा मालच वेगळा आहे, परंतु आई-वडील त्याला स्वतः सारखे बनवू इच्छितात. अरे, त्याला उमलू द्या, त्याच्या ज्या शक्ति आहेत त्या उमलून बाहेर येऊ द्या. कोणाचा स्वभाव कसा आहे, ते पाहून घ्यायचे आहे. अरे मुर्खा, त्यांच्याशी भांडतोस कशासाठी?
अर्थात् हा बगीचा ओळखण्यासारखा आहे. मी 'बगीचा' म्हणतो तेव्हा लोक समजून जातात आणि नंतर मग आपल्या मुलाला ओळखतात. अरे वेड्या, प्रकृतिला ओळख! एकदा मुलाला ओळखून घे आणि त्याप्रमाणे व्यवहार कर ना? त्याची प्रकृति पाहून व्यवहार केला तर काय होईल? मित्राच्या प्रकृतिला 'एडजस्ट' होता की नाही? तसेच प्रकृतिला पहावे लागते, प्रकतिला ओळखावे लागते. ओळखन घेतले तर घरामध्ये भांडण-तंटा होणार नाही. येथे तर मारून-मुटकून 'माझ्या सारखे बना,' असे सांगत असतात. पण ते तसे कसे बनु शकतील?
सर्व जग अशा व्यवहार ज्ञानाच्या शोधात आहे. हा धर्म नाही आहे. हे ज्ञान संसारात रहाण्याचा उपाय आहे. संसारात एडजस्ट होण्याचे उपाय आहे. वाइफसोबत एडजस्टमेन्ट कशी घ्यायची, मुलांसोबत एडजस्टमेन्ट कशी घ्यायची, याचे उपाय आहेत.
घरात भानगड होते, तेव्हा ह्या (ज्ञान) वाणीचे शब्द असे आहेत की सगळ्यांचे दु:ख दूर होतात, ह्या वाणीने सर्व चांगले होते. दु:ख दूर होतील, अशी वाणी लोक शोधत असतात. कारण की कोणी अजून असा उपाय दिलाच नाही ना! सरळ उपयोगात घेता येईल असे उपायच नाहीत ना!