________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
अजून एक-दोन जन्म बाकी राहिले आहेत, त्यासाठी सोबत त्याची गरज पडेल ना? बाहेरगावी जातो तेव्हा सोबत थोडी शिदोरी घेऊन जातो. तसेच येथे सुद्धा सोबत काही असायला पाहिजे ना?
५१
म्हणून मुलांना तर फक्त काय द्यायला पाहिजे, एक 'फ्लैट' (घर) द्यायचा, आपण रहात असू तो. ते सुद्धा असेल तर द्यायचा. त्याला सांगायचे की, ‘बेटा आम्ही ज्या दिवशी ह्या जगात नसू तेव्हा हे सर्व तुझे, तोपर्यंत मालकी आमची! वेडेपणा करशील तर तुला तुझ्या बायकोसोबत बाहेर काढून टाकेल. आम्ही आहोत तोपर्यंत तुझे काहीही नाही. आम्ही गेल्यानंतर सर्व काही तुझे.' विल (मृत्युपत्र) करुन ठेवायचे. तुमच्या वडीलांनी दिले असेल तेवढे तुम्ही त्याला द्यायचे आहे. तेवढाच त्याचा हक्क आहे. शेवटपर्यंत मुलाच्या मनात असे राहिले पाहिजे की, 'आता वडिलांजवळ पन्नासएक हजार अजून आहेत.' आपल्या जवळ लाख असोत. पण तो मनात समजेल की ४०-५० हजार तर देतील. त्याला त्या लालचमध्ये शेवटपर्यंत ठेवायचे. तो त्याच्या बायकोला सांगेल की, 'जा, वडिलांना फर्स्ट क्लास जेवण वाढ चहा-फराळ आण. ' आपण रूबाबात रहायचे. अर्थात आपल्या वडीलांनी जे घर दिले असेल ते त्याला द्यायचे.
कोणी स्वतः सोबत काहीएक घेऊन जाऊ देत नाही. आपण गेल्यावर आपल्या शरीराला जाळून टाकतात. तेव्हा मग मुलांसाठी जास्त सोडून गेलो तर? मुलांसाठी जास्त सोडून गेलात तर मुले काय करतील ? ते म्हणतील की, ‘आता नोकरी-धंदा करण्याची काही गरज नाही. ' मुले दारूडे होऊन जातील. कारण की त्यांना तशी संगत मिळते मग. हे सगळे दारूडेच झाले आहेत ना! म्हणून मुलांना तर पद्धतशीरपणे द्यायला हवे. जर जास्त दिले तर मग दुरूपयोग होईल. नेहमी जॉब (नोकरी) करीत राहिल असे करुन द्यायला हवे. रिकामा बसला तर दारू पिणार ना ?
एखादा बिझनेस त्याला आवडत असेल तर तो करुन द्यायचा. कोणता व्यवसाय आवडतो ते विचारून, त्याला जो व्यवसाय योग्य वाटत असेल तो करुन द्यायचा. पंचवीस-तीस हजार बॅन्केतून कर्ज काढून द्यायचे, म्हणजे तो स्वत:च फेडत राहिल आणि थोडे पैसे आपल्या जवळचे द्यायचे. त्याला गरज असेल त्यातील अर्धी रक्कम आपण द्यायची आणि अर्धी रक्कम