________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
निंदनीय आहे, परंतु मनुष्य जन्म मिळाल्यावरही सरळपणे रहात नाही तर काय होईल?
१३. बरे झाले, नाही अडकलो संसारजाळ्यात.... दादाश्री : चिंता-बिंता करता का कधी?
प्रश्नकर्ता : चिंता खूप नाही, परंतु कधी कधी असे वाटत असते की, तसे तर सर्व काही आहे पण मुल नाही आहे.
दादाश्री : अहाहा!!! म्हणजे खाणारा कोणी नाही आहे. एवढे सर्व काही आहे, खायायचे सर्व आहे तरी पण खाणारा कोणी नसेल तर उपाधीच ना!
क्वचितच एखाद्या खूप पुण्यवंतचा जनम लाभला असेल तेव्हा मुल नसते. कारण की मुल होणे न होणे सर्व आपल्या कर्माच्या वहीखात्याचा हिशोब आहे. ह्या जन्मात तुम्ही महा पुण्यवान आहात की तुम्हाला मुल झाले नाही. असे लोक खूप पुण्यवान म्हटले जातात. तर वेड्या, तुला कोणी असे शिकविले? तेव्हा म्हणाला, 'माझी बायको सारखी कटकट करत राहते.' मी म्हणालो, 'मी येईल तिथे.' नंतर मग त्याच्या पत्नीला समजावले मग ती समजून गेली. मी सांगितले की पहा, यांना तर काही समस्या नाही आहे. तुमच्या वहीत खातेच नाही, हे खूप चांगले आहे, नाही का? म्हणून तुम्ही तर परम-सुखीच आहात.
एकही अपत्य नसेल आणि मग मुल जन्मले तर ते मुल बापाला खूष करते, त्यांना खूप आनंदित करते. पण मग जातानाही ते तेवढेच रडवून जाते. म्हणून आपण हे समजून घ्यावे की, आले आहेत ते जेव्हा जातील, तेव्हा काय काय होत असते? म्हणून आजपासून हसायचेच नाही, तर मग काही भानगडच उरली नाही ना!
__ मुले म्हणजे आपल्या राग-द्वेषाचा हिशोब आहे. पैश्यांचा हिशोब नाही, राग-द्वेषाचे ऋणानुबंध असतात. राग-द्वेषाचा हिशोब फेडायला ही मुले बापाचे पिळून तेल काढतात. श्रेणिक राजाला पण मुलगा होता आणि तो त्यांना रोज चाबकाने फटके मारायचा, तुरूंगात पण घालायचा.