________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
बोलाल तरी सुद्धा आपले काम होईल. कारण की दादा भगवान आणि कृपाळुदेव आत्मस्वरूपाने एकच आहेत, शरीराने वेगळे दिसतात. डोळ्यांनी वेगळे दिसतात, परंतु वास्तविक ते एकच आहेत. आणि महावीर भगवानांचे नांव दिले तरी पण तेच आहेत. त्याच्या आत्म्याचे कल्याण होवो, एवढीच भावना आपल्याला निरंतर करायची आहे. आपण ज्याच्या सोबत निरंतर राहिलो, सोबत खाल्ले-पिल्ले, तर आपण त्याचे कशाप्रकारे कल्याण होईल अशी भावना करत राहायचे. आपण परक्यांसाठी चांगली भावना करत असतो, मग हे तर आपले स्वजन आहेत, त्यांच्यासाठी भावना का नाही करायची?
म्हणून आम्ही पुस्तकात लिहिले आहे की, तुला 'कल्प'च्या शेवटपर्यंत भटकावे लागेल. त्याचे नांव 'कल्पांत', कल्पांतचा अर्थ कोणी केलाच नाही ना? तुम्ही आज पहिल्यांदा ऐकला ना?
प्रश्नकर्ता : होय दादा, पहिल्यांदा ऐकला.
दादाश्री : म्हणून ह्या 'कल्प'च्या शेवटपर्यंत भटकावे लागते आणि लोक काय करतात? खूप कल्पांत करतात. अरे वेड्या कल्पांतचा अर्थ तर विचारून पहा की कल्पांत म्हणजे काय? कल्पांत तर कोणी एखादा मनुष्य करीत असतो. कल्पांत तर कोणाचा एकुलता एक मुलगा असेल, त्याचा अचानक मृत्यु झाला असेल अशावेळी कल्पांत होऊ शकतो.
प्रश्नकर्ता : दादाजींची किती मुलं होती?
दादाश्री : एक मुलगा आणि एक मुलगी होती. १९२८ मध्ये मुलगा जन्मला तेव्हा मी मित्रांना पेढे खाऊ घातले होते. नंतर १९३१ मध्ये मुलगा मृत्यु पावला. तेव्हा पुन्हा मी सर्वांना पेढे खाऊ घातले. सुरूवातील तर सर्वांना असे वाटले की दुसरा मुलगा जन्मला असेल, म्हणून पेढे खाऊ घालत असतील. पेढे खाईपर्यंत मी स्पष्टीकरण केले नाही. पेढे खाऊन झाल्यानंतर मी सर्वांना सांगितले, 'ते 'गेस्ट' (पाहूणे) आले होते ना, ते गेले!' ते सन्मानपूर्वक आले होते, तर आम्ही त्यांना सन्मानपूर्वक निरोप द्यायचा. म्हणून हा सन्मान केला. यावर सर्व मला रागवायला लागले. अरे, असे रागावू नका, सन्मानपूर्वक निरोप द्यायला पाहिजे.