________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
६३
बोला ना, नाहीतर विनाकारण अधोगतीमध्ये जाल. समस्यांमुळे जेव्हा उपाधी, कंटाळा येत असेल, तेव्हा कोणती गती होईल? येथून मग मनुष्य योनीमधून कोणत्या योनीमध्ये जन्म होईल? पशू योनीत. अत्यंत निंदनीय काम केले असेल तर नरक योनीमध्ये पण जावे लागते. नरक योनी व पशू योनी हे सर्व पसंत आहे?
प्रत्येक जन्मामध्ये भयंकर मार खाल्ला आहे, परंतु पुर्वीचा खाल्लेला मार विसरून जातो आणि नवीन मार खात राहतो. मागच्या जन्माच्या मुलांना सोडून येतो आणि ह्या जन्माच्या नवीन मुलांना कवटाळत असतो.
१४. नाती, रिलेटीव की रिअल ? हे रिलेटिव संबंध आहेत! सांभाळून सांभाळून काम करुन घ्यायचे आहे. हे रिलेटिव संबंध आहेत, म्हणून तुम्ही जेवढे रिलेटिव स्विकारणार तेवढे राहणार. तुम्ही जसे ठेवाल तसे राहिल, याचेच नांव व्यवहार आहे.
तुम्ही मानता की मुलगा माझा आहे, म्हणून कुठे जाणार आहे? अहो! मुलगा तुमचा आहे, परंतु घटक्यात विरोधी होऊन जाईल. कोणी आत्मा वडील-मुलगा नसतो. हे तर परस्परांचा देण्या-घेण्याचा हिशोब आहे. पण बघ हां, घरी गेल्यावर असे बोलू नकोस, की तुम्ही माझे वडील नाहीत. तसे ते व्यवहारने वडील आहेतच ना!
___ संसारात नाटकीय रहायचे आहे. 'या हो ताईसाहेब', 'ये बाळ', याप्रमाणे, आणि हे सर्व सुद्धा सुपरफ्लुअस (वरकरणी) करायचे. तेव्हा अज्ञानी काय करतो की मुलीला जवळ घेऊन मांडीवर बसवू पाहतो, त्यावर ती मुलगी सुद्धा त्याच्यावर चिडते. ज्ञानी पुरुष व्यवहारात सुपरफ्लुअस रहातात. म्हणून सगळे त्यांच्यावर खुष असतात, कारण की, लोकांना 'सुपरफ्लुअस' व्यवहार हवा असतो. जास्त आसक्ति लोकांना पसंत नाही. म्हणून आपण सुद्धा सुपरफ्लुअस रहायचे. ह्या सर्व भानगडीत पडायचे नाही.
ज्ञानी काय समजतात? की मुलीचा विवाह झाला तर, तो पण व्यवहार आणि मुलगी बिचारी विधवा झाली, तो पण व्यवहार. हे 'रिअल' नसते. हे दोन्हीही व्यवहार आहेत, रिलेटिव आहे आणि त्यास कोणी बदलू शकत नाही असे आहे ! तर लोक काय करतात? जावई मरून गेला, त्याच्या