________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
५३
का सोपिवले?! असा पश्चाताप होईल, त्यापेक्षा तसे न होऊ देता आपण लगाम आपल्या हातातच ठेवायला पाहिजे.
एकाने त्याच्या मुलास सांगितले की, 'ही सर्व संपत्ती तुलाच द्यायची आहे.' त्यावर मुलगा म्हणाला की, मी तुमच्या संपत्तीची आशा ठेवली नाही. तिचा वापर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करा, शेवटी निसर्गाचा निर्णय ही वेगळी गोष्ट आहे. परंतु त्याचा निश्चय, आणि त्याप्रमाणे त्याने आपला अभिप्राय दिला ना! म्हणून तो सर्टिफाइड (प्रमाणीत) होऊन गेला, त्याला आता मौजमजा काही राहिली नाही.
१२. मोहाच्या माराने मेलो अनेकदा प्रश्नकर्ता : मुले मोठी होतील, मग आपली रहातील की नाही कोणास ठाऊक?
दादाश्री : होय, कोणी आपले रहाते का? हे शरीर च आपले रहात नाही तर! हे शरीर सुद्धा नंतर आपल्यापासून घेतले जाते. कारण की परकी वस्तू आपल्या जवळ किती दिवस राहणार?
मुलगा 'पप्पाजी, पप्पाजी' बोलतो तेव्हा मोहापोटी पप्पाजी हवेत तरंगायला लागतात. आणि 'मम्मी, मम्मी' करतो तर मम्मी पण हवेत तरंगते, पप्पांच्या मिशा ओढल्या तरी पण पप्पाजी काहीच बोलेनात. ही लहान मुलं तर असे बरेच काही करत असतात. जर पप्पा-मम्मीचे भांडण झाले असेल तर ही मुलच मध्यस्थी बनून निकाल लावतात. भांडण तर नेहमी होतच असते ना! पति-पत्नीमध्ये तर तसे तू-तू, मी-मी होतच रहाते, तेव्हा मुलगा कशा प्रकारे समाधान करतो? सकाळी ते चहा पित नसतील, थोडेसे रूसले असतील, तर स्त्री मुलामार्फत काय सांगते की, बेटा, जा पप्पांना सांग, 'माझी आई चहा प्यायला बोलवते, पप्पाजी चला ना!' मग मुलगा पप्पांकडे जाऊन बोलतो, 'पप्पाजी, पप्पाजी' असे ऐकून तो सर्व काही विसरून लगेच चहा प्याला येतो. अशा प्रकारे सर्व काही चालत असते. बेटा 'पप्पाजी' बोलला की, अहाहा! माहित नाही कोणता मंत्र बोलला! अरे, आताच तर सांगत होता की मला चहा प्यायचा नाही? असे आहे हे जग!
ह्या जगामध्ये कोणी कोणाचा मुलगा झाला नाही. सर्व जगामध्ये असा