________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
५५
झोपायचे असेल तर झोपून जायचे चूपचाप.' वडील विचार करतात, 'आता झोपून जायचे चूपचाप, आता तर चूपचाप झोपलेलेच बरे! हे असे सर्व मला माहित नव्हते, नाहीतर संसार मांडलाच नसता.' आता जे झाले ते झाले. आम्हाला सुरूवातीला असे काही असेल ते माहित नव्हते ना, म्हणून तर संसार थाटला, आणि नंतर फसलो!
प्रश्नकर्ता : नावडते आले तर त्यास आत्महेतूसाठी उपयोगात आणायचे, असा अर्थ होतो?
दादाश्री : नावडते आले ते आत्म्यासाठी हितकारीच असते. ते आत्माचे विटामिनच आहे. दबाव आला की लगेच आत्मामध्ये राहतो ना? आता कोणी शिवीगाळ केली त्यावेळी संसारात न रहाता लगेचच आपल्या आत्म्यामध्येच एकाकार होऊन जातो परंतु ज्याला आत्माचे ज्ञान झालेले आहे तोच असे करू शकतो.
प्रश्नकर्ता : तर मग म्हातारपणी आमची सेवा कोण करणार?
दादाश्री : सेवा-चाकरीची अपेक्षा का करायची? आम्हाला त्रास नाही दिला तरी मिळवले. सेवेची अपेक्षा करायची नाही. शंभरातील पाच टक्के सेवा करणारे मिळतील. बाकी ९५ टक्के तर त्रास देतील असेच आहेत.
अहो! मुले तर काय करतात? एक मुलगा त्याच्या वडीलांना सांगतो की, 'तुम्ही मला माझा हिस्सा देऊन टाका, दररोज कटकट करतात ते मी खपवून घेणार नाही.' तेव्हा त्याच्या वडीलांनी सांगितले, 'तू मला एवढा त्रास दिला आहे की मी तुला इतका सुद्धा हिस्सा देणार नाही.'
ही माझी स्वत:ची कमाई आहे, म्हणून मी तुला ह्या संपत्तीतून काहीच देणार नाही.' तेव्हा मुलगा म्हणाला, 'हे सर्व माझ्या आजोबांचे आहे म्हणून मी कोर्टात दावा दाखल करेन.' मी कोर्टात लढेन परंतु सोडणार नाही. अर्थात् वस्तुतः ही मुले आपली कधी नसतातच.
वडील जर मुलाबरोबर एक तास भांडले, इतक्या घाणेरड्या शिवीगाळ केल्या, तेव्हा मुलगा काय म्हणतो? 'तुम्ही काय समजता?' वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीसाठी तो कोर्टात दावा सुद्धा दाखल करतो.