________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
४३
काहीही सांगावे लागत नाही आणि ह्या तिसऱ्या मुलामुळे माझे सर्व जीवन बर्बाद होत चालले आहे.' मी विचारले, 'काय करतो तुमचा मुलगा?' तेव्हा ते म्हणाले, 'रात्री दीड वाजता येतो. दारू ढोसून येतो.' मी विचारले, 'मग तुम्ही काय करता?' तेव्हा म्हणाले, 'मी दूरूनच बघतो त्याला, जर माझे तोंड दाखवले तर शिव्या देत राहतो. मी दूरूनच खिडकीतून पहात राहतो की काय करतो आहे?' तेव्हा मी विचारले, 'दीड वाजता घरी आल्यावर काय करतो?' तेव्हा म्हणाले, 'खाण्या-पिण्याचे तर काही बोलायलाच नको, जाऊन त्याचे अंथरुन घालून द्यायचे. आणि तो येवून लगेचच झोपून जातो आणि घोरायलाही लागतो.' यावर मी विचारले, मग तुझी दशा काय होते? तर म्हणाला, तो तर लगेचच झोपून जातो, बिनधास्त 'तर मग चिंता कोण करत असतो?' तेव्हा म्हणाले, 'ते तर मीच करत असतो.'
नंतर सांगतो की, त्याची ही अवस्था पाहून मला तर रात्रभर झोप येत नाही.' मी सांगितले, 'यात दोष तुझाच आहे.' तो तर आरामात झोपून जातो. तुमचा दोष, तुम्हीच भोगत असतात. मागच्या जन्मात दारूचे व्यसन लावणारा तूच आहे.' त्याला व्यसन लावून सटकलास. कशासाठी सवय लावली? लालच होती म्हणून. म्हणजे मागच्या जन्मात त्याला बिगडवलेस, वाईट मार्गावर चढवलेस, तर आता असे शिकवण्याचे फळ आले आहे ह्या जन्मात. आता आलेले फळ भोगा निवांतपणे! भोगतो त्याची चुक. पहा, तो तर आरामशीर झोपला आहे ना? आणि बाप रात्रभर चिंता करत राहतो. दीड वाजता त्याला जाणीव सुद्धा होते की आता तो आला आहे पण त्याला काही बोलू शकत नाही. वडील भोगतो, म्हणून चुक वडीलाची आहे.
सूनेला असे वाटते की सासरे दुसऱ्या खोलीत बसलेले आहेत. म्हणून ती दुसऱ्यांशी बोलत असते की, 'सासऱ्यांना थोडी अक्कल कमी आहे.' आता त्यावेळी आपण तेथे उभे असू तर आपल्याला ते ऐकायला येईल, तर आपल्या आतमध्ये त्याचा परिणाम होणार. तेव्हा आपण काय समजायला पाहिजे की आपण दुसऱ्या खोलीत बसलेलो असतो तर काय झाले असते? तेव्हा कोणताच परिणाम झाला नसता. म्हणजे येथे आलो त्या चुकीचा हा परिणाम आहे ! आपण ही चुक सुधारून घ्यावी, असे समजून की आपण