________________
४२
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
एक माणूस संडासाच्या दरवाज्याला लाथा मारीत होता. मी विचारले, 'लाथा का मारतो आहेस?' तो म्हणाला, 'खूप साफ करतो तरी सुद्धा दुर्गंधी येत राहते.' बोला, आता ही केवढी मोठी मुर्खता म्हणायची! संडासाच्या दरवाज्याला लाथा मारल्यावर सुद्धा दुर्गंधीच येते! ह्यात चुक कोणाची?
कित्येक लोक तर मुलाला खूप मारतात, ही काय मारण्याची वस्तू आहे? हे तर ग्लास वेअर (काचेच्या वस्तू) सारखे आहे. 'काचेची वस्तू' सांभाळून ठेवायला हवी. 'काचेची वस्तू' अशी फेकली तर? 'हॅन्डल विथ केअर.' अर्थात् सांभाळून ठेवा. आता असे नाही करायचे.
__ असे आहे की, ह्या जन्माच्या मुलांची चिंता आपण करीत असतो, परंतु मागच्या जन्मात जी मुले होती त्यांचे काय केले? प्रत्येक जन्मात मुले सोडून आला आहात, जेथे जन्म घेतला त्या जन्मातील सगळी मुले सोडूनच आलो आहोत. एवढी लहान-लहान की बिचारी भटकून जातील, अशा मुलांना सोडून आलो आहोत. तेथून येण्याची इच्छा नव्हती, तरी देखिल येथे
आलो आहोत. नंतर विसरलो आणि मग ह्या जन्मात दुसरी मुले आली! म्हणून मुलांच्या बाबतीत क्लेश कशाला करता? त्यांना धर्माच्या मार्गावर वळवा, ती चांगली होतील.
एक मुलगा तर इतका तिरसट होता की कडू औषध पाजले तर प्यायचाच नाही, घशा खाली उतरू द्यायचा नाही, परंतु त्याची आई सुद्धा पक्की होती. मुलगा जर एवढा तिरसट असेल तर त्याची आई कच्ची असणार का? तर आईने काय केले, त्याचे नाक दाबले आणि औषध एका झटक्यात घश्यात उतरले. परिणाम स्वरुप मुलगा अजून पक्का झाला! दुसऱ्या दिवशी ती जेव्हा औषध पाजत होती आणि नाक दाबायला गेली तर त्याने फूऊऊऊ करुन आईच्या डोळ्यात उडविले! ही तर तशीच 'क्वॉलिटी'! आईच्या पोटात नऊ महिने बिनभाड्याने राहिला तो नफा आणि वरून फूऊऊऊ करतो!
एक वडील मला सांगत होते की 'माझा तीन नंबरचा मुलगा खूप वाईट आहे. दोन मुले चांगली आहेत.' मी विचारले, 'तो वाईट आहे तर तुम्ही काय करणार ?' तेव्हा म्हणाले, 'काय करणार? दोन मुलांना मला