________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
त्याचे पुण्य बांधले जात असते. परंतु 'मी बाप आहे, त्याला थोडे मारायला तर हवे ना?' आतमध्ये जर असे बाप असल्याचे भाव येत असेल तर मग पाप बांधेल. अर्थात् जर योग्य समज नसेल तर मग त्यात असे विभाजन होत असते !
अर्थात् वडील मुलांवर चिडले तर त्याचे फळ काय ? पुण्य बांधले
४०
जाईल.
प्रश्नकर्ता: वडील तर चिडतात, परंतु मुलगा सुद्धा समोर चिडत असेल तर काय होणार ?
दादाश्री : मुलगा पाप बांधतो. क्रमिक मार्गात 'ज्ञानीपुरुष' शिष्यावर चिडले तर ते जबरदस्त पुण्य बांधत असतात, पुण्यानुबंधी पुण्य बांधत असतात. हे चिडणे व्यर्थ जात नसते. हे हे शिष्य नाहीत त्यांची मुले, की नाही काही घेणे-देणे, तरी सुद्धा त्यांच्यावर चिडत असतात.
आमच्याजवळ येथे रागवणे बिलकुल होत नाही ! रागावल्यावर माणूस स्पष्ट नाही बोलू शकत, कपट करतो. यामुळेच हे सर्व कपट जगात उत्पन्न झाले आहेत! ह्या जगामध्ये रागावण्याची आवश्कता नाही. मुलगा सिनेमा पाहून आला असेल आणि आपण त्याला रागावले तर दुसऱ्या दिवशी काहीतरी बहाणा करुन, 'स्कूलमध्ये काही कार्यक्रम होता' असे सांगून सिनेमा पाहून येईल! ज्यांच्या घरामध्ये आई कडक असेल, तिच्या मुलांना व्यवहार शिकणे जमत नाही.
प्रश्नकर्ता : मुलगा खूप पेप्सी पितो, खूप कोक पितो, चॉकलेट खूप खातो, त्यावेळी मी रागावतो.
दादाश्री : त्यात रागावण्याची काय गरज आहे ! त्याला समजावयाला पाहिजे की, जास्त खाल्याने काय नुकसान होणार. तुमच्यावर कोण रागावत असते? हा तर वरिष्ठपणाचा खोटा अहंकार आहे! मोठी, 'आई' होऊन बसली आहे !! आई होणे तर येत नाही आणि दिवसभर मुलाला रागवत राहते! तुझ्यावर जर सासू रागवेल तर तुला कळेल. मुलाला रागावणे कोणाला आवडेल का? मुलाला सुद्धा असे वाटेल की ही ( आई ) तर सासूपेक्षाही