________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : नंतर आपण आतून माफी मागयची. ह्या बहीणीला खूप जास्त बोलले गेले असेल आणि तिला दुःख झाले असेल तर तुम्ही ह्या बहीणीला सांगायचे की मी तुमची क्षमा मागतो. जर हे सांगता येईल असे नसेल तर अतिक्रमण झाले म्हणून आतून त्याचे प्रतिक्रमण करायचे. तुम्ही तर 'शुद्धात्मा आहात' म्हणून तुम्ही 'चंदूभाईला' (वाचकांनी येथे स्वत:चे नांव समजायचे.) सांगायचे की, 'प्रतिक्रमण करा.' तुम्हाला दोन्ही विभाग वेगळे ठेवायचे आहेत. एकटे असाल तेव्हा आतमध्ये आपण आपल्यालाच सांगायचे की ‘समोरच्याला दुःख होणार नाही असे बोलायचे.' तरीसुद्धा मुलाला दुःख झाले तर 'चंदूभाईला' सांगायचे, 'प्रतिक्रमण करा.'
प्रश्नकर्ता : परंतु आपल्यापेक्षा लहान असेल, आपला मुलगा असेल तर क्षमा कशी मागयची?
दादाश्री : आतून क्षमा मागायची, हृदयापासून क्षमा मागायची. असे दादा दिसतील आणि त्यांच्या साक्षीत अलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान त्या मुलाचे केले तर ते लगेच त्याला पोहचते.
प्रश्नकर्ता : आम्ही कोणाला रागवतो, परंतु त्याच्या भल्यासाठी रागवले असेल, जसे मुलांनाच रागवतो तर ते पाप गणले जाईल काय?
दादाश्री : नाही, त्यामुळे पुण्य बांधले जाते. मुलाच्या भल्यासाठी रागावले-मारले तरी सुद्धा पुण्य बांधले जाते. भगवंताच्या घरी अन्याय होतच नाही ना! मुलगा काही उलट वागत असल्यामुळे स्वत:ला अस्वस्थ वाटत असेल म्हणून त्याच्या भल्यासाठी त्याला दोन थप्पड मारल्यात, तरी सुद्धा त्याचे पुण्य बांधले जाते. त्यामुळे जर पाप गणले गेले असते तर हे क्रमिक मार्गातील साधू-आचार्य यापैकी कोणाचाही मोक्ष होऊच शकला नसता. दिवसभर शिष्यांप्रति अस्वस्थ होत असतात, रागवतात परंतु त्यामुळे पुण्य बांधले जाते. कारण की दुसऱ्यांच्या भल्यासाठी ते क्रोध करतात. स्वत:च्या भल्यासाठी क्रोध करणे पाप आहे. हा किती सुंदर न्याय आहे! किती न्यायपूर्ण आहे ! भगवान महावीरांचा न्याय किती सुंदर आहे! हा न्याय तर धर्मकाटाच आहे ना!!
म्हणून मुलांना त्यांच्या भल्यासाठी रागवत असाल, मारीत असाल तरी