Book Title: Aai Vadil Aani Mulancha Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 52
________________ आई - वडील आणि मुलांचा व्यवहार दादाश्री : समोरच्याला गरज असते ना तेव्हा. रूसणारा माणूस समोरच्याला त्याची गरज असेल तेव्हा तर रूसून बसतो. प्रश्नकर्ता : म्हणजे आम्हाला गरजच नाही असे दाखवायचे ? ३७ दादाश्री : गरज असायलाच नको, गरज कशासाठी ? कर्माच्या उदयानुसार जे होणार आहे ते होणारच मग त्याची गरज का ठेवायची ? आणि मग कर्माचा उदयच आहे. गरज दाखवल्यामुळे उलट जिद्दिला पेटतात. प्रश्नकर्ता : लहान मुलांचा राग दूर करण्यासाठी त्यांना थोडक्यात कसे समजावयाचे ? दादाश्री : त्यांचा राग दूर करुन काय फायदा ? प्रश्नकर्ता : आमच्यासोबत भांडणार नाहीत. दादाश्री : त्यासाठी दुसरा काही उपाय करण्याऐवजी त्यांच्या आईवडीलांनी अशाप्रकारे रहायला हवे की त्यांचे रागवणे मुलांना दिसूच नये. त्यांना रागवताना बघतात त्यामुळे मुलांना वाटते की माझे वडील करतात, तर मी त्यांच्याहून सव्वापटीने रागवेन तेव्हाच खरे. जर तुमचे बंद झाले, तर त्यांचे आपोआपच बंद होऊन जाईल. मी बंद केले आहे, माझे रागवणे बंद होऊन गेले आहे, म्हणून माझ्याशी कोणी रागवतच नाही. मी सांगतो रागव तरी सुद्धा कोणी रागवत नाही. मुले सुद्धा नाही रागवत, मी मारतो तरी सुद्धा रागवत नाही. प्रश्नकर्ता : मुलांना चांगल्या मार्गावर वळवण्याचे आई-वडीलांचे कर्तव्य तर पार पाडायला पाहिजे ना, त्यासाठी रागावावे तर लागते ना ? दादाश्री : कशाला रागवावे लागते ? असेच समजावून सांगण्यास काय हरकत आहे ? तुम्ही रागवत नाही, तुमच्याकडून रागावले जाते. रागावले जाते त्याला रागावले, असे म्हणता येणार नाही. तुम्ही स्वतः जर रागावलात तरच, हे तुम्ही धमकावले, ते नाही, त्याला रागवणे म्हणत नाही. म्हणजे रागवायचे पण तुम्ही तर स्वतः रागवणारे होऊन जातात. रागवायला हरकत नाही. प्रश्नकर्ता : रागवण्याचे कारण काय ? दादाश्री : विकनेस, ही 'विकनेस' (निर्बलता) आहे. म्हणजे तो

Loading...

Page Navigation
1 ... 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101