________________
३
६
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
करत असतील तरी सुद्धा त्यांना कोणी काही बोलणार नाही. असे सर्व घडते ते त्याच्या मागे असलेल्या रूटकॉझ (मुळ कारणा) मुळे. आपल्या घरी दोन अपत्ये असतील, तर दोघे समान वाटायला हवीत. जर आपण एकाच्या बाजूने असाल की, 'हा मोठा दयाळू आहे आणि लहान कमी पडतो.' तर सर्व बिघडून जाते म्हणून दोघेही समान वाटायला हवेत.
प्रश्नकर्ता : मुलगा घटक्या-घटक्याला रुसतो.
दादाश्री : खूप महाग आहे ना! खूप महाग, मग काय होणार? मुलगी स्वस्त आहे, म्हणून रूसत नाही बिचारी.
प्रश्नकर्ता : हे रूसने का होत असेल, दादाजी?
दादाश्री : हे तर मनवायला जातात ना, म्हणून रूसतो. माझ्याकडे रूसून दाखवा तर! माझ्या जवळ कोणी रूसत नाही. मी पुन्हा बोलवणारच नाही ना! पुन्हा बोलणार नाही, खावो किंवा न खावो, पण मी काही बोलायला जात नाही. मला माहित आहे, अशामुळे उलट वाईट सवय लागते, जास्त वाईट सवय लागते. नाही, नाही, बाळ जेवण करुन घे, बाळ जेवण करुन घे, अरे, भूक लागेल तर बाळ आपणहून खाऊन घेईल, कुठे जाणार आहे? तश्या तर मला दुसऱ्या कला सुद्धा येतात. खूप आखडू असेल तर भूक लागलेली असणार तरी सुद्धा नाही खाणार. असे असेल तर आम्ही आत त्याच्या आत्म्याजवळ विधी करतो, तुम्ही असे नाही करायचे. तुम्ही जे करीत आहात तेच करा. बाकी माझ्या जवळ नाही रूसत आणि येथे माझ्याकडे रूसून सुद्धा काय फायदा काढणार?
प्रश्नकर्ता : दादाजी, ही कला शिकवा ना, कारण की हे रूसनेमनवणे तर सगळ्यांना नेहमीचेच होऊन गेले आहे. जरा अशी एकाधी चावी द्या की सगळ्यांचे निराकरण होऊन जाईल.
दादाश्री : आपल्याला खूप गरज असेल तर तो असा रूसून बसतो. एवढी सर्व गरज दाखवायचीच कशाला मग?
प्रश्नकर्ता : म्हणजे याचा अर्थ काय, मी समजलो नाही, खूप गरज असेल तर असा रूसून बसतो? कोणाला गरज असते?