________________
४४
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दुसरीकडेच बसलेलो होतो आणि हे सर्व आपण ऐकलेच नव्हते. अशाप्रकारे चुक सुधारून घ्यायची.
__ महावीर भगवंताच्या पाठीमागे सुद्धा लोक (उलट-सुलट) बोलायचे. लोक तर बोलतातच, आपण आपली चुक संपवायची. त्याला योग्य वाटले तसे बोलेल. आपल्या वाईट कर्मांचा उदय असेल तेव्हाच तर असे उलटसुलट त्याच्याकडून बोलले जाते.
मुलांचा अहंकार जागृत झाल्यानंतर त्यांना काहीच सांगू शकत नाही आणि काही बोलायचेच कशाला? त्याला ठेच लागेल तेव्हा शिकेल. मुले पांच वर्षाची होईपर्यंत त्यांना बोलायची सुट आहे. आणि पाच ते सोळा वर्षाच्या मुलांना कदाचित कधी तरी दोन टपल्याही माराव्या लागतील. परंतु वीस वर्षाचा तरुण झाल्या नंतर असे करू शकत नाही. त्याला एक शब्द सुद्धा बोलू नये. बोलणे हा गुन्हा आहे. नाहीतर एकाद्या दिवशी तुमच्यावर बंदूक झाडेल.
'मागीतल्या शिवाय सल्ला देऊ नये' असे आम्ही लिहिलेही आहे! जर कोणी आपल्याला बोलले काही विचारले, तेव्हा आपण सल्ला द्यावा आणि त्यावेळी जे योग्य वाटेल ते सांगावे. सल्ला दिल्यानंतर हे सुद्धा सांगायचे की तुला अनुकूल असेल तसे कर. आम्ही तर तुला हे सांगितले. म्हणजे त्याला वाईट वाटेल असे कोणतेही कारण रहात नाही. अर्थात् आम्हाला हे जे सर्व करायचे आहे ते विनयपूर्वक करावे.
ह्या काळात कमीतकमी बोलणे याच्या सारखे दुसरे काहीही नाही. ह्या काळामध्ये वाणी दगडासारखी आघात करणारी निघते, सर्वांचे असेच होत असते. म्हणून बोलण्याचे कमी केलेले जास्त चांगले आहे. कोणाला काही बोलण्यासारखे नाही. बोलल्याने अजून बिघडते. त्याला जर बोललो की, 'गाडीवर लवकर जा.' तेव्हा तो उशीरानेच जाईल आणि काहीही नाही बोललात तर वेळेवर जाईल. आम्ही नसलो तरी सर्व चालेल असे आहे. हा तर स्वत:चा खोटा अहंकार आहे. ज्या दिवसापासून मुलांसोबतची कटकट बंद होईल, त्या दिवसापासून मुले सुधरायला लागतील. तुमचे शब्द चांगले निघत नाही म्हणून समोरचा चिडतो. तुमचे शब्द स्विकारले जात नाही