Book Title: Aai Vadil Aani Mulancha Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 56
________________ आई - वडील आणि मुलांचा व्यवहार वाईट आहे. म्हणून मुलास रागवणे सोडून दे. त्याला शांतपणे समजावयाचे की हे असे खाऊ नको, त्यामुळे तुझी तब्बेत बिघडेल. ४१ तो चुकीचे करीत असेल तरी पण त्याला सारखे-सारखे मारणे योग्य नव्हे. चुकीचे वागत असेल म्हणून सारखे-सारखे मारले तर काय होईल ? एक माणूस तर जसे कपडे धुतात, त्याप्रकारे मुलाची धुलाई करीत होता. अरे मुर्खा! बाप असून मुलाची ही काय काय दशा करतो आहे ? त्याक्षणी मुलगा मनात काय ठरवत असतो, माहीत आहे का ? सहन होत नसल्यामुळे तो मनात ठरवतो, की,' मोठे झाल्यावर मी तुम्हाला मारेल, बघाच तुम्ही.' असा पक्का निश्चय करुन टाकतो. आणि नंतर मोठे झाल्यावर त्याला रोज मारतही असतो. मारल्याने जग सुधरत नाही. रागावण्याने किंवा चिडल्याने सुद्धा कोणी सुधरत नाही. योग्य ते करुन दाखविल्यावर सुधारते. जेवढे बोलाल तेवढा वेडेपणा ठरेल. एक भाई होते. ते रात्री दोन वाजता काय-काय करुन घरी येत असत! त्याचे वर्णन करण्यासारखे नाही. तुम्हीच समजून जा. मग घरातील लोकांनी ठरविले की त्याला रागवायचे की घरात घुसू नाही द्यायचे ? कोणता उपाय करावा? नंतर त्या लोकांनी अनुभव घेतला. त्याचा मोठा भाऊ सांगायला गेला तर तो त्याला म्हणे, 'तुला मारल्या शिवाय सोडणार नाही. ' मग घरातील सगळे मला विचारायला आलेत की, 'ह्याचे काय करावे ? हा तर असा बोलतो. ' तेव्हा मी घरच्यांना सांगितले की, 'कोणी एक अक्षर सुद्धा बोलायचे नाही. बोललात तर तो अजून जास्त उर्मट होईल, घरात यायला दिले नाही तर तुमच्या जीवावर उठेल. त्याला जेव्हा यायचे असेल तेव्हा येऊ द्या आणि जेव्हा जायचे तेव्हा जाऊ द्या. आपण त्याचे 'राइट' (खरे) पण नाही बोलायचे आणि 'राँग' (खोटे) पण नाही बोलायचे. राग पण नाही करायचा, द्वेष पण नाही करायचा. समता ठेवायची आहे, करुणा ठेवायची आहे.' तीन - चार वर्षानंतर तो भाई सरळ मार्गावर आला ! आज तो व्यापारामध्ये खूप मदत करतो आहे. जग वायफळ नाही आहे, परंतु काम करवून घेता यायला हवे. सर्वांच्या आत भगवंत आहेत आणि सगळे वेगवेगळे कार्य घेऊन बसले आहेत, म्हणून नापसंत असे मत ठेवू नये.

Loading...

Page Navigation
1 ... 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101