________________
३४
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
मुलगा ऐकत का नाही? तर म्हणे, 'त्याने स्वत:च्या आई-वडीलांचे कधी एकलेच नव्हते ना!'
प्रश्नकर्ता : दादाजी, त्यात वातावरणाचा दोष आहे की नाही ?
दादाश्री : नाही, वातावरणाचा दोष नाही. खरे तर आई-वडीलांना आई-वडील होता आलेच नाही. आई-वडील बनणे ही तर सर्वात मोठी जबाबदारी आहे. प्रधानमंत्री होण्याची जबाबदारी ही त्यापेक्षा कमी आहे.
प्रश्नकर्ता : ते कसे?
दादाश्री : प्रधानमंत्री होण्यात तर लोकांचे ऑपरेशन आहे. येथे तर स्वतःच्या मुलांचेच ऑपरेशन व्हायचे आहे. घरामध्ये आल्याबरोबर मुले खुश होऊन जातील असे असायला हवे. आणि आजकालची मुले तर काय म्हणतात? 'आमचे वडील घरात नाही आलेत तर बरे.' अरे, मुर्खा असे असेल तर काय होणार?
म्हणून आम्ही लोकांना सांगत असतो, 'भाऊ, सोळा वर्षानंतर मुलांना फ्रेन्ड म्हणून स्विकारा.' असे सांगितले की नाही ! 'फ्रेन्डली टोन' (मैत्रीपूर्ण संवाद) असेल ना, तर आपली वाणी चांगलीच निघते, नाहीतर दररोज वडील बनलात तर त्यातून कोणते ही सार निघणार नाही. मुलगा चाळीस वर्षाचा झाला असेल तरीही आपण बापपणा दाखवत राहणार तर कसे होणार?
प्रश्नकर्ता : परंतु दादाजी, वृद्ध लोक सुद्धा आमच्याशी असे वर्तन करतात, त्यांचे विचार जुनाट (जुने) असतील, तर आम्ही त्यांना कसे हैन्डल (हाताळायला) करायचे ? कोणत्या प्रकारच्या बुद्धिने?
दादाश्री : ऐन घाईच्यावेळी गाडी जर पंक्चर झाली तर काय आपण तिच्या व्हीलला (चाकाला) मार-मार करतो का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : ऐन वेळी घाई असेल आणि टायर पंक्चर झाले तर व्हीलला मारायला पाहिजे का? तेव्हा तर सर्व पटापट सांभाळून आपले काम