________________
२
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : आपण सांगता की आजची जनरेशन 'हेल्दी माईन्डवाली' आहे आणि दुसऱ्या बाजूने पहावे तर सर्व व्यसनी होऊन गेले आहेत, आणि माहीत नाही अजून काय काय आहे ते?
दादाश्री : भले ते व्यसनी दिसत असतील, परंतु त्या बिचाऱ्यांना योग्य मार्ग नाही मिळाला तेव्हा मग काय करणार ? पण त्यांचे माईन्ड हेल्दी आहे.
प्रश्नकर्ता : हेल्दी माईन्ड म्हणजे काय ?
दादाश्री : हेल्दी माईन्ड म्हणजे माझे-तुझे ह्याची जास्त पर्वा करत नाही. आणि आम्ही तर लहान होतो तेव्हा बाहेर कोणाचे काही पडलेले असेल, किंवा कोणी काही दिले तर घेण्याची इच्छा होत असे. कोणाकडे जेवायला गेलो तर घरी खातो त्यापेक्षा थोडे जास्त खात असू. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे ममतावाले होते.
अरे! ही 'डबल बेड' ची सिस्टम हिन्दुस्थानात होती का? जनावरां सारखे लोक ? हिन्दुस्थानातील स्त्री-पुरुष कधी एकत्र एका खोलीत नसतात! नेहमी वेगळ्या खोलीतच रहात असत! तसे न होता आज हे पहा ना! आता तर बापच बेडरुम बनवून देतो, डबल बेड! ह्यामुळे मुले समजून गेली की, हे जग अशा प्रकारेच चालते. तुम्हाला कल्पना आहे की पूर्वी स्त्रीपुरुषांचे अंथरुन वेगळ्या-वेगळ्या खोलीत असायचे. तुम्हाला माहीत नाही? हे सर्व मी पाहिलेले होते. तुम्ही हे डबल बेड बघितले होते का कधी?
९ आई-वडीलांच्या तक्रारी ! एक भाई मला सांगत असे, माझा पुतण्या दररोज नऊ वाजता उठतो. घरामध्ये कोणतेच काम करीत नाही. मग घरातील सगळ्यांना विचारले की हा लवकर नाही उठत ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना आवडत नाही का? तर सगळे म्हणाले, 'आम्हाला आवडत नाही, तरी पण तो लवकर उठतच नाही.' मी विचारले, 'सूर्यनारायण उगवल्यावर तर उठतो की नाही उठत?' तेव्हा म्हणाले, 'त्यानंतर सुद्धा एक तासानंतर उठतो.' त्यावर मी सांगितले की, 'सूर्यनारायणची सुद्धा मर्यादा ठेवत नाही, तो तर मग खूप मोठा माणूस असेल!' नाहीतर लोक सुर्यनारायण उगवण्याच्या अगोदरच झोपेतून जागे होतात, परंतु हा तर सुर्यनारायणाची सुद्धा पर्वा करत नाही.' मग त्या लोकांनी