________________
आई - वडील आणि मुलांचा व्यवहार
तर जेव्हा त्यांना जळजळते तेव्हा. हे टी.व्ही, सिनेमा, सगळे घाणेरडा चिखला सारखे आहेत. या सर्वांतून काहीही सारतत्त्व निघत नाही. आमचा टी. व्ही. ला काहीही विरोध नाही आहे. प्रत्येक वस्तू पाहण्याची सूट आहे परंतु एकीकडे पाच वाजून दहा मिनिटला टी. व्ही चा कार्यक्रम असेल व दुसरीकडे सत्संग असेल, तर काय आवडेल? अकरा वाजता परीक्षा असेल आणि अकरा वाजता जेवायचे असेल तर काय निवडणार ? अशी समज असायला पाहिजे!
३०
प्रश्नकर्ता : रात्री उशीरापर्यंत टी. व्ही पहात असतात, म्हणून मग झोपतच नाही ना?
दादाश्री : परंतु टी.व्ही तर तुम्ही विकत आणला तेव्हा पाहतात ना ? तुम्हीच ह्या सगळ्या मुलांना बिघडवले आहे. ह्या आई-वडीलांनीच मुलांना बिघडवले आहे, वरुन टी. व्ही आणतात घरात ! अगोदरच काय कमी तुफान होते, त्यात पुन्हा एकाची भर ?
नवीन पॅन्ट घालून आरश्यात सारखे पहातात. अरे, आरश्यात काय पहातो आहे ? ही कोणाची नक्कल करतात ते तर समजा! अध्यात्मवाल्यांची नक्कल केली की भौतिकवाल्यांची नक्कल केली ? जर भौतिकवाल्यांची नक्कल करायची असेल तर त्यासाठी ते आफ्रिकावाले आहेत, त्यांची नक्कल का नाही करीत ? परंतु हे साहेबासारखे दिसण्यासाठी, नक्कल करतो. पण तुझ्यात काही बरकत तर नाही ! कसला साहेब होऊन फिरतोस ? पण तो तर साहेब होण्यासाठी असे आरश्यामध्ये पहातो, केस वळवतो आणि समजतो की आता मी 'ऑलराइट' झालो. आणि पॅन्ट घालून मागून थोपडथापड करीत फिरत असतो. अरे, उगीच कशाला थोपडथापड करतोस? कोणीही बघणार नाही. सगळे आपआपल्या कामात व्यस्त आहे. सगळे आपआपल्या चिंतेत आहेत.
तुला पहाण्यासाठी कोण रिकामा बसला आहे ? सगळे आपआपल्या विवंचनेत पडलेले आहेत. परंतु स्वतःला काय समजून बसले आहेत ?
जुन्या पिढीवाले जर मुलांसोबत कटकट करत असतील तर मी त्यांना विचारु इच्छितो की तुम्ही लहान असताना तुमचे वडील सुद्धा तुम्हाला काही