________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
असेल ती सुद्धा कापू शकतो.' 'त्यावेळी 'हार्ट' वर परिणाम होईल?' तेव्हा म्हणाला, नाही होणार.' नंतर मी विचारले, 'बकरी कापू शकतोस?' तेव्हा म्हणाला, नाही.' कोंबडी कापू शकतोस? तेव्हा म्हणाला, 'नाही, माझ्याने नाही कापली जाणार.' म्हणून तुझे हार्ट कापण्यास ‘एक्सेप्ट' (स्विकार) करेल, तेवढ्याच वस्तू तू खायच्या. तुझे हार्ट एक्सेप्ट नाही करत, हार्टला पसंत नाही, रुचत नाही त्या वस्तू नाही खायच्या. नाहीतर त्याचा परिणाम विपरीत होईल आणि ते परमाणू तुझ्या हार्टवर परिणाम करतील. तेव्हा मुले सर्व काही चांगल्या प्रकारे समजली आणि मांसाहार सोडून दिला.
एक प्रसिद्ध लेखक 'बनार्ड शॉ' यांना कोणी तरी विचारले, 'तुम्ही मांसाहार का नाही करत?' तेव्हा ते म्हणाले, 'माझे शरीर कब्रस्तान नाही आहे, हे कोंबडा-कोंबडीचे कब्रस्तान नाही आहे.' परंतु त्यात काय फायदा? तेव्हा ते म्हणालेत, 'आई वॉन्ट टू बी ए सिविलाइज्ड मेन.' (मला सुसंस्कृत मनुष्य व्हावयाचे आहे.) तरी सुद्धा करतात, क्षत्रियांना हा अधिकार आहे. परंतु त्यांच्यात क्षत्रियता असेल तर अधिकार आहे.
प्रश्नकर्ता : ह्या लहान मुलांना मगस (एक प्रकारची जास्त तुपातली मिठाई) खाऊ घालत असतात, ती खायला देऊ शकतो का?
दादाश्री : नाही खायला द्यायची, मगस नाही खायला द्यायचे. लहान मुलांना मगस, डिंकपाक, पक्वान्न अशी मिठाई खायला द्यायची नाही. त्यांना साधे जेवण द्यायचे आणि दूध पण कमी द्यायला हवे. मुलांना हे सर्व द्यायला नको. आपले लोक तर दूधापासून केलेल्या वस्तू सारखे-सारखे खायला देत असतात. अरे! अश्या वस्तू खाऊ घालायच्या नाही. उत्तेजना वाढेल आणि बारा वर्षाचा झाल्याबरोबर त्याची दृष्टी बिघडेल. उत्तेजना कमी होईल असे जेवण मुलांना द्यायला हवे. हे सर्व तर माहित च नाही. जीवन कसे जगायचे, याची समजच नाही ना!
प्रश्नकर्ता : बरोबर आहे, आम्हाला काही बोलायचे नाही, परंतु समजा की आमचा मुलगा चोरी करीत असेल तर त्याला चोरी करु द्यावी का?