________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
विचार सुद्धा येत नाहीत. पण जी माणसं डेवलप (विकसित) झालेली आहेत, त्यांचा मेंदू ह्यातून बाहेर पडल्या नंतर खूप चांगला डेवलप होत जातो! त्याला मग पुन्हा बिघडवायचे नाही.
प्रश्नकर्ता : दारू प्यालामुळे मेंदुला जे काही डॅमेज (नुकसान) झाले आहे, मेंदूचे परमाणू डॅमेज झालेले आहेत, तर तो डॅमेज झालेला भाग पुन्हा रिपेअर कशा प्रकारे होईल?
दादाश्री : त्यावर काही उपाय नाही. ते तर काही काळानंतर हळूहळू होईल. प्यायल्या शिवायचा जो काळ जाईल, तस तसे निरावरण होत जाईल. लगेच होणार नाही. दारू आणि मांसाहार यांच्यामुळे जे नुकसान होत असते, दारू आणि मांसाहारपासून जे सुख भोगतो, ते सुख 'रिपे' (परतफेड) करतांना त्याला पशुयोनीमध्ये जावे लागते. हे जेवढे काही सुख तुम्ही घेता त्याला 'रिपे' करावेच लागेल, अशी जबाबदारी आपल्याला समजायला हवी. हे जग पोकळ ढोल नाही आहे. ते तर चुकते करावेच लागेल असे जग आहे. फक्त ह्या आंतरिक सुखाचे 'रिपे' करावे नाही लागत! इतर सर्व बाहेरचे सुख 'रिपे' करावे लागते. जेवढे आम्हाला जमा करायचे असेल ते करा पण मग ते परतफेड तर करावे लागेल!!
प्रश्नकर्ता : येणाऱ्या जन्मामध्ये पशू होऊन 'रिपे' करावे लागेल, ते तर बरोबर आहे. परंतु ह्या जन्मामध्ये काय होणार? ह्या जन्माचे काय परिणाम आहे?
दादाश्री : ह्या जन्मामध्ये त्याला स्वत:वर आवरण येतात म्हणजे जड सारखे, पशू सारखाच झालेला असतो. लोकांमध्ये 'प्रेस्टिज' (अब्रु) रहात नाही, लोकांमध्ये सन्मान रहात नाही, काही सुद्धा रहात नाही.
अंडी असो की पिल्लू असोत दोन्ही एकच आहेत. कोणाचे अंडे खाणे आणि कोणाचे पिल्लू खाणे ह्यात फरक नाही. पिल्लू खाणे तुला पसंत आहे? दुसऱ्यांचे पिल्लू खाणे आवडेल?
प्रश्नकर्ता : अंड्यांमध्ये सुद्धा शाकाहारी अंडी असतात अशी लोकांची मान्यता झाली आहे.