________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : नाही, ही तर चुकीची मान्यता आहे. ज्या अंड्यांना निर्जीव अंडी म्हणतात, ती जीवरहित वस्तू आहे. ज्याच्यात जीव नाही, ती वस्तू खाऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : ही गोष्ट वेगळीच वाटते, कृपया विस्ताराने समजवा ना!
दादाश्री : वेगळी म्हणजे, एक्झेक्ट (तंतोतंत) गोष्ट आहे. हे तर शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेले आहे की निर्जीव वस्तू कधीच खाऊ शकत नाही, जीवीत वस्तूच खाल्ली जाते. ज्यात जीव असतो परंतु वेगळ्या प्रकारचा जीव, पण तेव्हा लोकांनी त्याचा गैरफायदा करुन घेतला. अरे त्याला तर स्पर्श सुद्धा करायला नको. मुलांना अंडे खाऊ घातल्यामुळे काय होते? शरीर इतके विकारी आवेशमय होऊन जाते की मग त्यांच्या नियंत्रणात रहात नाही. आपले 'व्हेजेटेरियन फूड' (शाकाहारी जेवण) तर खूपच उत्कृष्ठ असते, भले कच्चे असो. डॉक्टरांचा यामध्ये दोष नाही. डॉक्टर तर त्यांची स्वत:ची समज आणि बुद्धिच्या आधारे सांगतात. आपल्याला आपल्या संस्कारांचे रक्षण तर करायला हवे ना! आपण संस्कारी घरातले लोक आहोत.
प्रश्नकर्ता : अमेरिकेत दादांनी किती तरी मुलांना एकदम 'टर्न' (बदल) करुन दिलेत.
दादाश्री : होय, त्यांचे आई-वडील तक्रार घेऊन आले होते की आमची मुले बिघडत चालली आहेत, त्यांचे काय करायचे? मी सांगितले, 'तुम्ही केव्हा सुधरलेले होता की मुले बिघडून गेली आहेत! तुम्ही मांसाहार करता?' तेव्हा ते म्हणाले, 'होय, कधी कधी.' 'दारू पिता का?' तर म्हणाले 'कधी कधी' म्हणूनच ह्या मुलांना वाटते की माझे वडील करतात म्हणजे ही हितकारी वस्तु आहे. जे हितकारी असेल तेच माझे वडील करतील ना? अर्थात् असे करणे तुम्हाला शोभत नाही. मग त्या मुलांना मांसाहारातून सोडवले. त्या मुलांना विचारले की 'तू हा बटाटा कापू शकतो का? ही पपई कापू शकतो का? हे 'एप्पल' कापू शकतो का?' 'होय, सर्व कापू शकतो.' मी सांगितले, 'भोपळा एवढा मोठा असला तर?' 'होय, त्याला सुद्धा कापू शकतो' 'काकडी एवढी मोठी