________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
सांगत होते का? तेव्हा सांगतात की, ते सुद्धा अशीच कटकट करायचे. त्यांच्या वडीलांना विचारले की तुम्ही लहान होते तेव्हा? ते सुद्धा अशीच कटकट करायचे. त्यांच्या वडीलांना विचारले की तुम्ही लहान होते तेव्हा? ते सुद्धा सांगतात की, आमचे वडील देखिल कटकट करायचे. म्हणून हे 'पुर्वापार चालत आलेले आहे !' 'आगे से चली आयी!'
मुलगा जुन्या गोष्टी स्विकारायला तयार नाही. म्हणून ह्या सगळ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. मी बापाला मॉडर्न (आधुनिक) होण्यास सांगतो पण ते होत नाही. कसे होणार? मॉडर्न होणे ही काही सोपी गोष्टी नाही.
आपला देश युझलेस (बेकार) होऊन गेला आहे! काही जातींचा खूप तिरस्कार करत असतात. एक-दुसऱ्या सोबत बसत नाही, भेदभाव करीत असतात. वर हात ठेऊन प्रसाद देतात! परंतु ही नवीन पिढी हेल्दी माईन्डवाली आहे. खूपच चांगली आहे!
मुलांसाठी चांगली भावना करतच रहा. सर्व चांगले संयोग जुळून येतील. नाहीतर ह्या मुलांमध्ये काही सुधारणा होणार नाही. मुले सुधारतील परंतु आपआपल्या परीने, निसर्ग सुधरवेल त्यांना. मुले चांगल्यात चांगली आहेत. कोणत्याही काळात नव्हती अशी मुले आहते आज!
ह्या मुलांमध्ये असे कोणते गुण असतील की मी असे सांगतो आहे की कोणत्या काळात नव्हती असे गुण ह्या मुलांमध्ये आहेत! बिचाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा तिरस्कार नाही. काही सुद्धा नाही. फक्त मोही आहेत! सिनेमा पहायला, दुसरे काही पहायला भटकत असतात. पण पूर्वी तर इतका तिरस्कार होता की ब्राह्मणांची मुले दुसऱ्यांना शिवत नव्हती. आजकाल आहेका अशी डोकेफोडी?
प्रश्नकर्ता : आता असे काही नाही. जरा सुद्धा नाही.
दादाश्री : सगळा माल स्वच्छ झाला आहे. लोभ सुद्धा नाही, मानाची सुद्धा पर्वा करत नाही. आतापर्यंत तर सगळा खोटा (मलीन) माल होता, मानी-क्रोधी-लोभी ! आणि हे तर मोही आहेत बिचारे.