________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
३
सांगितले, तुम्ही त्याला थोडे रागवा. मी सांगितले, 'आम्ही रागवू शकत नाही. आम्ही रागवायला नाही आलो, आम्ही समज द्यायला आलो आहोत, आमचा रागवण्याचा व्यापारच नाही, आमचा तर समज देण्याचा व्यापार आहे.' मग त्या मुलाला सांगितले, 'दर्शन करुन घे, नंतर दररोज बोल की दादा मला लवकर उठण्याची शक्ति द्या.' एवढे त्याच्याकडून करवून घेतल्यानंतर घरातील सर्व लोकांना सांगितले, की आता तर हा चहाच्या वेळेवरही उठला नाही तर त्याला विचारायचे की, 'भाई, हे पांघरुन देऊ तुला? हिवाळ्याची थंडी आहे, ओढायचे असेल तर पांघरुन देऊ का तुला?' मस्करी म्हणून नाही, परंतु खरोखर त्याला पांघरुन पांघरायचे. घरातील लोकांनी तसे केले. परिणाम स्वरुप सहा महिन्यातच तो मुलगा एवढा लवकर उठायला लागला की, घरातील सगळ्या लोकांची तक्रार बंद झाली.
प्रश्नकर्ता : हल्लीची मुले अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त लक्ष देतात, त्यांना अभ्यासाकडे वळविण्यासाठी त्यांच्याकडून कशाप्रकारे काम घ्यायचे की, ज्यामुळे मुलांच्या प्रति क्लेश निर्माण होणार नाही?
दादाश्री : इनामी योजना काढा ना! मुलांना सांगा की, ज्याचा पहिला नंबर येईल त्यास एवढे बक्षीस देणार आणि सहावा नंबर येईल, त्याला एवढे बक्षीस आणि पास होईल त्याला एवढे बक्षीस. त्यांचा उत्साह वाढेल असे काही करा. त्याला त्वरित फायदा होईल असे काही दाखवा, तरच मग तो आव्हान स्विकारेल. दुसरा काय उपाय करणार? नाहीतर त्याच्यावर प्रेम ठेवा. जर प्रेम असेल तर मुले सर्व काही स्विकारतात. माझ्याकडे मुले सर्व काही स्विकारतात. मी जे सांगेन ते करण्यास तयार असतात, म्हणजे आपण त्यांना सतत समजावत राहिले पाहिजे. मग ते जे करतील ते खरे.
प्रश्नकर्ता : मुख्य समस्या ही आहे की अभ्यास करण्यासाठी मुलांना आम्ही बऱ्याच प्रकारे समजावत असतो, परंतु आमच्या सांगण्याने मुले समजत नाही, आमचे ऐकतच नाही.
दादाश्री : नाही, ते ऐकत नाही, कारण की तुम्हाला आई होता आले नाही म्हणून. जर आई होता आले असते तर का नाही ऐकणार? त्याचा