________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
३५
करुन घ्यायला हवे. बिचाऱ्या गाडीला जसे पंक्चर होत असतात. तसेच वृद्ध लोकांना सुद्धा पंक्चर होत असतात. आम्ही सांभाळून घ्यायला हवे. गाडीला मार-ठोक करुन चालेल का?
प्रश्नकर्ता : दोन भावंडे आपआपसात भांडत असतील, आपणास माहीत आहे की दोघेही समजवण्या पलीकडचे आहेत, अशा वेळी आपण काय केले पाहिजे?
दादाश्री : एकदा दोघांना बसवून त्यांना सांगायला हवे की, आपआपसात भांडण्यात फायदा नाही, त्यामुळे तर येणारी लक्ष्मी जात राहते.
प्रश्नकर्ता : परंतु ते जर ऐकायलाच तयार नाहीत तर काय करायचे, दादाजी?
दादाश्री : राहू द्यायचे. जसे आहे तसे राहू द्यायचे.
प्रश्नकर्ता : मुले आपआपसात भांडतात आणि ते जर विकोपाला गेले तर आम्ही म्हणतो की हे असे कसे झाले?
दादाश्री : त्यांना बोध घेऊ द्या ना, आपआपसात भांडल्यामुळे स्वतःची स्वत:लाच समज येईल ना? असे पुन्हा-पुन्हा आवर घालत राहिल्याने बोध नाही होणार. जग फक्त निरीक्षण करण्यायोग्य आहे. जगत तर जाणण्यायोग्य आहे.
ही अपत्य कोणाची होतच नाहीत, हे तर माथी येऊन पडलेली जंजाळ आहे ! म्हणजे त्यांची मदत अवश्य करावी पण आतून नाटकीय राहून.
तक्रार करायला प्रथम कोण येत असते? कलियुगात तर जो गुन्हेगार असेल, तोच प्रथम तक्रार घेऊन येत असतो ! आणि सत्युगात जो निर्दोष असेल तो तक्रार घेऊन येत असे. ह्या कलियुगात न्याय करणारे देखिल असे आहेत की ज्याचे प्रथम ऐकले त्याच्या बाजूने होऊन जातात (त्यांचीच बाजू घेतात.)
घरात चार अपत्ये असतील, त्यातील दोघांची काहीच चुक नसेल तरी सुद्धा वडील त्याला सारखे दटावत असतात आणि दुसरे दोन चूका