________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : दाखवण्यासाठी विरोध करा, पण आतमध्ये समभाव ठेवा. बाहेर दिसण्यास विरोध आणि तो चोरी करतो आहे, त्यावर निर्दयता किंचित्-पण होऊ देउ नका. जर आतील समभाव तुटुन गेला तर निर्दयता होईल. सर्व जग निर्दय होत असते.
त्याला समजवा की 'ज्याची चोरी केली, त्याचे असे प्रतिक्रमण करायचे आणि प्रतिक्रमण किती वेळा केले ते मला सांगायचे, तर मग ठीक होऊन जाईल. यापुढे तू चोरी करणार नाही याबद्दलची प्रतिज्ञा कर. पुन्हा चोरी करणार नाही आणि जी केली गेली त्याची क्षमा मागतो. अशाप्रकारे सारखे-सारखे समजावल्यामुळे हे ज्ञान पक्के होऊन जाते. त्यामुळे पुढच्या जन्मी चोरी नाही करणार. हा तर फक्त इफेक्ट (परिणाम) आहे, दुसरे नवीन आम्ही शिकवायचे नाही. तर मग नवीन उभे राहणार नाही.
हा मुलगा आमच्या जवळ सगळ्या चूका कबूल करतो. चोरी केली ती सुद्धा कबूल करतो. आलोचना तर गजब पुरुष असेल तेथेच होऊ शकते. जर असे सर्व झाले तर हिन्दुस्थानाचा आश्चर्यकारक परिवर्तन होऊन जाईल!
८. नवीन जनरेशन, हेल्दी माईन्डची! दादाश्री : रविवारी तुमच्या जवळपासच सत्संग होत असतो, तर का येत नाही?
प्रश्नकर्ता : रविवारच्या दिवशी टी.व्ही. पाहायचा असते ना, दादाजी!
दादाश्री : टी.व्ही आणि तुमचा काय संबंध? हा, चष्मा लावला आहे तरी सुद्धा टी.व्ही. पहाता? आमचा देश असा आहे की टी.व्ही. पहावा लागत नाही, नाटक पहावे लागत नाही, ते सर्व येथल्या येथे रस्त्यावर होत असते ना!
प्रश्नकर्ता : या वाटेवर पोहचलो तेव्हा बंद होईल ना?
दादाश्री : कृष्ण भगवान गीतेमध्ये सांगून गेले की मनुष्य वेळ वाया घालवत आहेत. कमवण्यासाठी नोकरीला जाणे अनर्थ म्हटले जात नाही. जोपर्यंत ती दृष्टी नाही मिळत तोपर्यंत ही दृष्टी सुटत नाही.
लोक सुद्धा पशू सारखे अंगावर घाणेरडा चिखल केव्हा चोपडतात?