________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
२५
करु नकोस तू, दादाची आज्ञा आहे, म्हणून अश्या वस्तूंना स्पर्श करायचाच नाही. तरच तुमचे जीवन चांगले व्यतीत होईल. कारण की, आता तुला त्याची आवश्कता वाटणार नाही. हे चरणविधि इत्यादि वाचणार तर तुला त्याची गरज पडणार नाही आणि भरपूर आनंद राहील, खूप आनंद राहील. समजले ना? समजले की नाही?
प्रश्नकर्ता : व्यसनांपासून मुक्त कशा प्रकारे राहायचे?
दादाश्री : व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी 'व्यसन वाईट वस्तु आहे.' अशी आपली प्रतीति झाली पाहिजे. ही प्रतीति ढिली पडता कामा नये. आपला निश्चय डगमगायला नको, असे असेल तर मनुष्य व्यसनांपासून दूरच राहतो. पण त्यात काही हरकत नाही.' असे बोलल्याबरोबर व्यसन अजून पक्के होते.
प्रश्नकर्ता : बऱ्याच काळापासून कोणी दारू पीत असेल किंवा ड्रग्स (नशीले पदार्थ) घेतले असतील, तर सांगतात की त्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर झालेला असतो. त्यामूळे तो नशा बंद करतो तरी पण त्याचा परिणाम तर राहतोच. तर त्या परिणामांपासून मुक्त होण्यासाठी दादा आपण काय सांगाल? कशा प्रकारे बाहेर पडायचे, त्यासाठी काही मार्ग आहे?
दादाश्री : नाही, परंतु नंतर परत रिएक्शन येते त्याची. जे परमाणू आहेत ते सगळे शुद्ध झाले पाहिजेत ना! आता तर प्यायचे बंद करुन दिले आहे ना? मग आता त्याचे काय करायचे आहे ? 'दारू पिणे वाईट आहे' असे नेहमी बोलत राहायचे. होय, सोडल्यानंतर सुद्धा असे बोलत राहायचे. परंतु चांगली आहे असे कधीच बोलू नये. नाहीतर पुन्हा त्याचा परिणाम होणार.
प्रश्नकर्ता : दारू प्यायल्याने मेंदूवर कशा प्रकारचे नुकसान होत असते?
दादाश्री : त्यामुळे भान हरपते ना, त्यावेळी आतील जागृति वर आवरण येत असते. नंतर नेहमीसाठी ते आवरण हटत नाही. मनात आपल्याला वाटते की ते निघून गेले, परंतु निघत नाही, असे करता करता आवरण येऊन, येऊन मग.... माणसावर जडत्व येते. नंतर मग त्याला चांगले