________________
२४
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
लहान मुलांच्या सोबत आमचे खूप जमते. माझ्याबरोबर फ्रेन्डशिप (मित्रता) करतात. आता मी जेव्हा आत येत होतो ना, तेव्हा एक एवढासा मुलगा होता, तो मला घ्यायला आला आणि म्हणाला 'चला. येथे आल्याबरोबर घ्यायला आला. आमच्या सोबत फ्रेन्डशिप करतात. तुम्ही लाड करतात. आम्ही लाड नाही प्रेम करतो.'
प्रश्नकर्ता : हे जरा समजवा ना दादाजी, लाड करणे आणि प्रेम करणे. हे सर्व उदाहरण देऊन समजवा.
दादाश्री : अरे, एका माणसाने तर स्वत:च्या मुलाला दाबले, असे छातीवर! दोन वर्षांपासून त्याला भेटला नव्हता आणि उचलून असे दाबले! तेव्हा ते मुल खूप दाबले गेले, त्याच्याकडे काही पर्याय उरला नाही, म्हणून शेवटी त्याने बापाला चावला. ही काय रीत आहे? ह्या लोकांना तर बाप होणे सुद्धा नाही जमत!
प्रश्नकर्ता : आणि प्रेमवाला असेल, तो काय करतो?
दादाश्री : हो, तो त्याच्यावर प्रेमाने हात फिरवतो, गालावर हात फिरवतो, असा पाठीवर हळूच थोपडतो. असे-तसे करुन खुश करतो. नाहीतर काय त्याला असे दाबून टाकायचे? मग तो बिचारा गुदमरला तर चावणारच ना! श्वास कोंडला गेला तर चावणार नाही?
आणि मुलांना कधी मारु नका. जर काही चुक-भूल झाली तर अवश्य समजवा, हळूवार डोक्यावर हात फिरवून त्याला जरुर समजवा. प्रेम दिले तर मुले समंजस होतात.
७. 'विकृति' अशी सुटून जाईल ड्रिंक्स (दारू) वगैरे काही घेता का?
प्रश्नकर्ता : कधीतरी जेव्हा घरामध्ये भांडण होत असते तेव्हा. हे मी खरे बोलतो आहे.
दादाश्री : ते बंद करुन टाका. त्यामुळे लाचार होऊन गेलात. आपल्याला हे नाही चालणार, हे नाही पाहिजे. घेऊच नकोस. स्पर्श सुद्धा