________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
कसा होऊन जातो? गुलाबाच्या फुलासारखा? नाही? तर आपला चेहरा बिघडला की समजायचे पाप लागले. आपला चेहरा बिघडेल अशी वाणी निघाली तर समजायचे पाप लागेल. कटू वाणी बोलू नका. थोडे शब्द बोला परंतु हळू आवाजात समजावून सांगा. प्रेम ठेवा, तेव्हा एक दिवस जिंकू शकाल. कटूताने जिंकू शकणार नाही. उलट तो विरोधात जाईल आणि उल्टे कर्म बांधेल. तो मुलगा उलटे परिणाम येईल असे कर्म बांधेल. 'आता तर मी लहान आहे म्हणून असे दटवतात, परंतु मोठे झाल्यावर मी बघून घेईन.' असे अभिप्राय आत बांधत राहतो. अर्थात असे करु नका, त्याला समजवा. एक दिवस प्रेम जिंकेल. दोनच दिवसात त्याचे फळ येणार नाही. दहा दिवस, पंधरा दिवस, महिन्यापर्यंत त्याच्यासोबत प्रेमाने रहा. मग पहा, ह्या प्रेमाचा परिणाम काय येतो, हे पहा तर!
प्रश्नकर्ता : आम्ही बऱ्याचदा समजावले परंतु तो समजत नाही तर काय करायचे?
दादाश्री : समजावण्याची आवश्कता च नाही. प्रेम ठेवा. तरी सुद्धा आपण हळूवार त्याला समज देत रहा. आपल्या शेजाऱ्यांशी सुद्धा आपण असे कटु वचन बोलतो का कधी?
जसे विस्तवाला आपण काय करतो? चिमट्याने पकडतो ना ? चिमटा ठेवतो ना? आणि जर असाच हातात विस्तव पकडला तर काय होईल?
प्रश्नकर्ता : चटका लागेल. दादाश्री : म्हणून चिमटा ठेवावा लागतो. प्रश्नकर्ता : मग कोणत्या प्रकारचा चिमटा ठेवायला पाहिजे?
दादाश्री : आपल्या घरातील एक माणूस चिमट्यासारखा आहे, तो स्वतः जळत नाही आणि समोरच्या जळालेल्याला पकडतो, आपण त्याला बोलावून सांगितले पाहिजे की, 'भाऊ, मी जेव्हा याच्याशी बोलेल तेव्हा त मला साथ दे.' त्यानंतर तो सर्व ठीक करुन देईल. काहीतरी मार्ग काढायला हवा. नुसत्या हातानेच विस्तव पकडायला गेलात तर काय होईल?