________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : तुम्हाला बाप असल्याचे भाव सोडावा लागेल.
प्रश्नकर्ता : 'हा माझा मुलगा' असे मानायचे नाही आणि 'मी वडील आहे' असेही मानायचे नाही?
दादाश्री : तर त्याच्या सारखा दुसरा नियमच नाही.
माझ्या प्रेमळ स्वभावामुळे अशी दोन-चार लोकं मला प्रेमाने 'दादा' म्हणायचे. इतर सगळे तर 'दादा केव्हापासून आलात?' असे वरकरणी विचायायचे. मी सांगायचो परवा आलो. तद्-नंतर काहीच नाही, दिखावटी नमस्कार! परंतु ते तर रेग्युलर नमस्कार करायचे. मी शोधून काढले की त्यांनी मला 'दादा' म्हटले तेव्हा मीही मनातून त्यांना 'दादा' म्हणायचे, अर्थात् प्लस-मायनस (बेरीज-वजावाकी) करायचो, भेद उडवायचो. मी त्यांना मनातून दादा म्हणायचो त्यामुळे माझे मन खूप चांगले रहायला लागले, हलके वाटायला लागले. तसे तसे त्यांना 'अट्रेक्शन' (आकर्षण) जास्त व्हायला
लागले.
मी त्यांना मनापासून दादा मानायचो म्हणून त्यांच्या मनापर्यंत माझे सांगणे पोहचत होते ना! त्यांना वाटायचे ओहोहो! माझ्यावर किती प्रेमभाव आहे. ही खूप समजण्यासारखी गोष्ट आहे. अशी गोष्ट केव्हा तरी निघते. तर हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर असे करता आले तर कल्याण होऊन जाईल असे आहे. मग काय केले? असा व्यवहार नेहमी चालायलाचा म्हणून त्यांच्या मनामध्ये असेच वाटायचे की दादा सारखा कोणी माणूस कुठेही मिळणार नाही.
प्रश्नकर्ता : वडील असे विचार करतात की मुलगा मला एडजस्ट (अनुकूल) का होत नाही?
दादाश्री : हे तर त्यांच्या वडीलपणा आहे म्हणून बेभानपणा आहे. वडीलपणा म्हणजे बेभानपणा, धनीपणा हे बेभानपणा जेथे 'पणा' शब्द आला तेथे बेभानपणाच आला.
प्रश्नकर्ता : उलट बाप असे म्हणतो की मी तुझा बाप आहे, तू का माझे ऐकत नाहीस? माझा मान ठेवत नाहीस?