________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
करायला पाहिजे तेव्हा मुले तुमची बनून रहातील. नाहीतर मुले तुमची बनून राहणार नाहीत. खरे तर मुले कोणाची नसतातच. एखादा मनुष्य मरुन गेला, त्याच्या मागे त्याचा मुलगा मरतो का कधी? सगळे घरी येऊन खातातपितात. ही मुले, मुले नाही आहेत. हे तर फक्त निसर्गनियमाच्या आधारे तसे दिसते एवढेच. 'युवर फ्रेन्ड' (तुझा मित्र) सारखे रहायला पाहिजे. तुम्ही प्रथम नक्की केले तर फ्रेन्ड सारखे राहू शकता. जसे मित्रला वाईट वाटेल असे बोलत नाही, तो उलट करीत असेल तरी आपण मित्राला कुठपर्यंत समजावत असतो? तर तो मान्य करेल तोपर्यंत आणि नाही मान्य केले तर शेवटी त्याला सांगतो की, 'जशी तुझी इच्छा!' आणि मनामध्ये फ्रेन्ड बनण्यासाठी सुरुवातीला काय करायला पाहिजे? बाह्य व्यवहारामध्ये मी त्याचा वडील आहे, परंतु आत मनामध्ये आपण मानले पाहिजे की मी त्याचा मुलगा आहे. तेव्हाच फ्रेन्डशिप होणार! नाहीतर नाही होणार? वडील फ्रेन्ड कसे बनतील? त्याच्या लेवल (पातळी) ला आलो तरच. त्या लेवलला कशा प्रकारे यायचे? तर मनामध्ये असे मानायचे की 'मी त्याचा मुलगा आहे.' जर असे म्हटले तर काम फत्ते होणार. बरेच लोक असे म्हणतात, आणि त्यांचे काम होऊन जाते!
प्रश्नकर्ता : आपण सांगता की मुले सोळा वर्षाची झाल्यानंतर फ्रेन्ड बनायचे, परंतु सोळा वर्षापूर्वी पण त्यांच्यासोबत फ्रेन्डशिपच ठेवायची का?
दादाश्री : तसे असेल तर खूपच चांगले. परंतु दहा-अकरा वर्षापर्यंत आपण फ्रेन्डशिप ठेऊ शकत नाही. तोपर्यंत त्याच्याकडून चुक-भूल होत असते. म्हणून त्याला समज द्यायला हवी. एखादी चापट पण मारावी लागते, दहा-अकरा वर्षापर्यंत. तो वडीलांची मिशी ओढत असेल तर चापट पण मारावी लागते. जे बाप बनायला गेलेत ना, ते मार खाऊन मेलेत.
प्रत्येकाने आपल्या मुलांना सुधारण्यासाठी सगळे प्रयत्न करायला हवे. परंतु प्रयत्न सफळ व्हायला हवेत. बाप झालात पण मुलांना सुधारण्यासाठी बापपणा सोडता येईल का ? 'मी बाप आहे' हे सोडणार का?
प्रश्नकर्ता : पण तो जर सुधरत असेल तर अहम् भाव, द्वेष, सर्व सोडून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे?