________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
घेतो, बस झाले ' 'तू स्वयंपाक का नाही केलास?' असे बोलणारे फौजदार होऊन जातात. तेथे असे फौजदारी करायला लागतात.
५. समजावल्याने सुधरतात मुले असे कटकट करण्याऐवजी मौन राहिलेले चांगले, न बोलणे चांगले. मुले सुधरण्याऐवजी बिघडतात, म्हणून एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. मुले बिघडल्याची जबाबदारी आपली आहे. ही समजण्यासारखी गोष्ट आहे ना?
आपण सांगतो की असे करु नको तेव्हा तो उलटच करतो. 'मी करणारच जा, तुम्हाला जे काही करायचे ते करा.' हे तर अजून जास्त बिघडवतात! मुले आपली अब्रू मातीत मिसळवतात. ह्या भारतीयांना जीवन जगणे सुद्धा आले नाही! वडील होणे जमले नाही तरी वडील होऊन बसलेत. म्हणून मला असे-तसे करुन समजवावे लागते, पुस्तके प्रकाशित करावी लागतात. नाहीतर ज्यांनी आपले ज्ञान घेतले आहे, ते तर मुलांना खूप चांगले घडवू शकतात. मुलाला जवळ बसवून, डोक्यावर हात फिरवून विचारायचे की, 'बेटा तुझ्याकडून ही चुक झाली आहे, असे नाही का वाटत!'
तर इन्डियन फिलोसॉफी (भारतीय तात्त्विक समज) कशी असते? आई-वडीलांपैकी एक जण रागावत असेल तर दुसरा मुलाची बाजू घेतो. म्हणून तो जर सुधरत असेल, तर सुधरायचे राहिले बाजूला, वरुन मुलगा काय समजतो की 'आई चांगली आहे आणि पप्पा वाईट आहेत, मोठा झाल्यावर मी त्यांना मारील.'
___ मुलांना सुधारायचे असेल तर आमच्या आज्ञेनुसार चला. मुलांनी विचारले तरच बोलायचे आणि त्याना सांगून पण टाकायचे की मला नाही विचारले तर उत्तम. मुलांच्या बाबतीत उलट विचार आलेत तर लगेच त्याचे प्रतिक्रमण करुन टाकायचे.
कोणाला सुधारायची शक्ति ह्या काळात संपून गेली आहे. म्हणून सुधारण्याच्या अपेक्षा सोडून द्या. कारण की मन-वचन-काया यांची एकात्मता असेल तरच समोरचा सुधरु शकतो. मनात जसे आहे तसे वाणीतून निघाले आणि तसेच वर्तनमध्ये असेल तरच समोरचा सुधरेल.