________________
१६
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : कोणालाही किंचित्-मात्र दुःख द्यावे असा मनात भाव नाही. आपल्या शत्रूला सुद्धा दुःख पोहचविण्याचा भाव व्हायला नको. त्याच्यात 'सिन्सियारिटी' (निष्ठा) असावी, 'मोरालिटी' (नैतिकता) असावी, सर्व गुण समाविष्ट असावेत. किंचित्-मात्र हिंसक भाव नसेल तर तो 'शीलवान' म्हटला जातो. तेथे वाघ सुद्धा शांत होऊन जातो.
प्रश्नकर्ता : आजकालचे आई-वडील असे सर्व कुठून आणतील?
दादाश्री : तरी सुद्धा त्यातले थोडे फार, निदान पंचवीस टक्के तरी पाहिजे की नाही? परंतु आपण ह्या काळामुळे आईस्क्रीम चे कप खात राहतो असे होऊन गेलो आहोत.
प्रश्नकर्ता : वडीलांचे चारित्र्य कसे असायला हवे?
दादाश्री : मुले दररोज म्हणतील की, पप्पा आम्हाला बाहेर करमतच नाही. तुमच्यासोबत खूपच चांगले वाटते. असे चारित्र्य असायला हवे.
प्रश्नकर्ता : हे तर उलट होत असते, वडील घरात असतील तर मुले बाहेर जातात आणि वडील बाहेर गेले तर मुले घरात असतात.
दादाश्री : मुलांना पप्पांशिवाय करमत नाही असे असायला हवे. प्रश्नकर्ता : तर तसे होण्यासाठी पप्पांनी काय करायचे?
दादाश्री : मला मुले भेटतात ना, त्या मुलांना माझ्याशिवाय करमत नाही. म्हातारे भेटतात, तर त्यांना पण माझ्या शिवाय चांगले वाटत नाही. युवक भेटतात, तर त्यांना पण माझ्या शिवाय चांगले वाटत नाही.
प्रश्नकर्ता : आम्हाला सुद्धा आपल्या सारखे व्हायचे आहे.
दादाश्री : होय, जर तुम्ही सुद्धा माझ्या सारखे करणार तर तसे होऊन जाणार. तुम्ही म्हणणार, 'पेप्सी आण.' तर तो सांगेल, 'नाही आहे' तरी काही हरकत नाही, मग पाणी घेऊन ये. पण तुम्ही तर तेव्हा म्हणाल, 'पेप्सी का आणून ठेवला नाही?' तर ही झाली भानगड मग. आम्ही तर दुपारची जेवण्याची वेळ झाली असेल आणि आतून सांगितले की, 'आज जेवण नाही बनविले' तर मी म्हणतो की, 'ठीक आहे, मग पाणी आण थोडे पिऊन