________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
हल्लीच्या काळात तसे नाही आहे. घरामध्ये प्रत्येकासोबत कसा व्यवहार असावा त्याची 'नॉरमालिटी' (सर्वसामान्य परिस्थिती) आणली पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार यामध्ये चांगला फेरफार झाला तर स्वत: परमात्मा बनु शकतो आणि त्याच्या उलट विपरीत बदल झाला तर राक्षस सुद्धा होऊ शकतो.
लोक समोरच्याला सुधारण्यासाठी सर्व काही फ्रेक्चर करुन टाकतात. प्रथम स्वतः सुधरा मगच दुसऱ्याला सुधारु शकाल. परंतु स्वतः सुधरल्याशिवाय समोरचा कसा सुधरेल?
आपण मुलांसाठी भावना करीत राहायचे की मुलांची बुद्धि चांगली होवो. असे करता करता खूप दिवसानंतर परिणाम आल्या शिवाय राहणार नाही. ते तर हळू-हळू समजेल, तुम्ही भावना करीत राहा. त्यांच्यावर सक्ती करणार तर उलट बिघडतील. म्हणून जेम तेम करुन संसार निभावून घेण्यासारखा आहे.
मुलगा दारू पिऊन येतो आणि तुम्हाला दु:ख देतो, तेव्हा तुम्ही मला सांगाल की हा मुलगा मला खूप दुःख देत असतो. तर मी सांगेल की चुक तुमची आहे, म्हणून शांतपणे, गप्प राहून भाव न बिघडवता सहन करुन घ्या. हा भगवान महावीरांचा नियम आहे आणि जगाच्या लोकांचा नियम तर वेगळा आहे. जगातले लोक सांगतील की 'मुलाची चुक आहे.' असे सांगणारे तुम्हाला येऊन भेटतील आणि तुम्ही सुद्धा ताठ होणार की, 'मुलाचीच चुक आहे, माझी समज तर बरोबर आहे.' मोठे आले समजवाले! भगवान म्हणतात, 'चुक तुझी आहे.'
तुम्ही मुलांसोबत फ्रेन्डशिप (मित्रता) केली तर ते सुधरतील. तुमची फ्रेन्डशिप असेल तर मुले सुधरतील. परंतु आई-वडीलांसारखे रहाल, रूबाब करायला जाल, तर धोकाच आहे. फ्रेन्ड (मित्र) सारखे रहायला पाहिजे. जेणे करुन बाहेर फ्रेन्ड शोधणारच नाहीत, अशा प्रकारे रहायला पाहिजे. जर तुम्ही फ्रेन्ड आहात, तर त्याच्या बरोबर खेळायला हवे. फ्रेन्ड सारखे सगळे करायला पाहिजे! तू आल्यानंतर आम्ही चहा पिणार, असे सांगायला हवे. आपण सगळे एकत्र बसून चहा पिऊ. तुमचा मित्र आहे अशा प्रकारे वर्तन