________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
२१
दादाश्री : एकाला तर मी असे बोलताना ऐकले होते 'तुला माहित नाही की मी तुझा बाप आहे ते!' कश्यात हेचे चक्रम जन्मले आहेत? हे सुद्धा बोलावे लागते? जे ज्ञान प्रगटपणे सर्व जगाला माहित आहे, ते सुद्धा बोलण्याची वेळ आली आहे?
प्रश्नकर्ता : दादा, याच्या पुढचा डायलोग (संवाद) सुद्धा मी ऐकला आहे की तुम्हाला कोणी सांगितले होते की आम्हाला जन्माला घाला! दादाश्री : असे म्हणाला तर आपली अब्रू काय राहिली मग?
६. प्रेमाने सुधारा चिमुकल्यांना प्रश्नकर्ता : त्यांची चुक होत असेल तर टोकावे तर लागेल ना?
दादाश्री : तेव्हा आपण त्याला असे विचारले पाहिजे की, हे तू जे काही करत आहे, ते तुला योग्य वाटते का? तू ते सर्व विचारपूर्वक केलेस ना? तेव्हा तो सांगेल की मला योग्य वाटत नाही. तर आपण सांगायचे की बाळ, मग आपण उगीच असे का करायचे? असे तुम्ही स्वतः विचारपूर्वक सांगा ना! सगळे स्वतः न्यायाधीशच आहेत, सर्वजण समजतात, चुकीचे होत आहे, हे स्वतः मुले सुद्धा जाणतातच ! परंतु तुम्ही त्याला, 'तू मूर्ख आहेस, गाढव आहेस, तू असे का केलेस?' असे बोललात तर तो उलट हट्टाला पेटतो, काही नाही, 'मी करतो आहे तेच बरोबर आहे जा.' असे म्हणून उलटे करेल. तेव्हा मग घर कसे चालवायचे ते ही जमत नाही. जीवन कसे जगायचे ते जमत नाही. म्हणून जीवन जगण्याच्या सगळ्या युक्त्या येथे दिलेल्या आहेत की, कशाप्रकारे जीवन जगायचे ते?
समोरच्याचा अहंकार जागृत होणारच नाही. आमचा आवाज सत्तायुक्त नसतो. अर्थात् सत्ता असायला नको. मुलांना तुम्ही काहीही सांगा पण आवाज सत्तायुक्त नसला पाहिजे.
प्रश्नकर्ता : संसारात रहात असताना किती तरी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, आणि जबाबदाऱ्या पार पाडणे हा एक धर्म आहे. हा धर्म बजावताना अकारण वाणी बोलावी लागली तर ते पाप की दोष आहे?
दादाश्री : असे आहे ना, की कटू वाणी बोलताना आपला चेहरा