________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : असेच असते का, की नेहमी वडीलांचीच चुक असते?
दादाश्री : वडीलांचीच चुक असते. त्याला वडील होता आले नाही, म्हणून हे सर्व बिनसले. घरामध्ये जर वडील व्हायचे असेल, तर त्याची स्त्री त्याच्याजवळ विषयासाठी भीक मागेल, अशी त्याची दृष्टी झाली तरच वडील होता आले असे होईल.
प्रश्नकर्ता : वडील घरामध्ये वडीलपणा राखत नाही, वडीलपणा राखत नाही तेव्हा त्याची चुक गणली जाते? ।
दादाश्री : तेव्हा तर सगळे काही ठीक होईल.
प्रश्नकर्ता : त्यानंतर तरी मुले वडीलांचे सांगितलेले ऐकतील, याची खात्री आहे का?
दादाश्री : आहे ना! आपले 'करेक्टर' (चारित्र्य) चांगले असेल, तर सर्व जग करेक्टरवाले (चारित्र्यवान) आहे.
प्रश्नकर्ता : मुले टुकार निघालीत तर त्यात वडील काय करणार?
दादाश्री : मुळ दोष वडीलांचाच असतो. तो का भोगतो आहे ? पूर्वी सुद्धा आचरण बिघडलेलेच होते, त्यामुळे ही दशा झाली ना? ज्याचे स्वत:च्या आचरणावरचे कंट्रोल (अंकुश) कोणत्याही जन्मामध्ये बिघडलेले नसेल तर त्याच्यासोबत असे घडत नाही, हे मी सांगू इच्छितो! पूर्वकर्मे कशी झालीत? मुळातच आपले कंट्रोल नव्हते तेव्हा ना! म्हणजे आम्ही कंट्रोलमध्ये मानतो. कंट्रोल मान्य करण्यासाठी तुम्हाला त्याचे सर्व नियम समजून घ्यायला हवे. ही मुले आपला आरसा आहेत. आपल्या मुलांवरुन कळते की आपल्यात किती चूका आहेत!
जर आपल्यात शील नांवाचा गुण असेल तर वाघ सुद्धा आपल्याला वश होतो. तर मुलांची काय मजल? आपल्यातच शीलचा ठिकाणा नसल्यामुळे, ही सगळी भानगड आहे. शील समजलात ना?
प्रश्नकर्ता : शील कोणाला म्हणायचे? त्याच्या बाबतीत जरा विस्ताराने सर्वांना समजेल अशा प्रकारे सांगा ना!