________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
१३
तुम्ही मला सांगितले ना की, माझे सांगणे तुम्हाला आवडते तर तुमच्याने सुद्धा एवढे होईलच.
प्रश्नकर्ता : आपल्या वाणीचा प्रभाव अश्याप्रकारे होत असतो की, जे कोडं बुद्धिने सोडवता येत नसते ते ह्या वाणी सुटते.
दादाश्री : हृदयस्पर्शी वाणी. हृदयस्पर्शी वाणीला तर मदरली (मातृत्वमयी) म्हटली जाते. हृदयस्पर्शी वाणीने जर काही वडील आपल्या मुलास बोलले, तर ते सर्टिफाइड फादर म्हटले जातील!
प्रश्नकर्ता : एवढे सहजपणे मुले ऐकत नाहीत.
दादाश्री : मग काय हिटलरिजम (जोर-जुलमाने) ने ऐकतात? हिटलरीजमने केले तर ते हेल्पफुल होत नाही.
प्रश्नकर्ता : ते ऐकतात, पण खूप समजावल्यानंतर.
दादाश्री : तरी हरकत नाही. तेही नियमाने आहे. खूप समजवावे लागते, त्याचे कारण काय आहे? की तुम्ही स्वतः समजलेले नाही, म्हणून जास्त समजवावे लागते. समंजस माणसाला तर एकदाच समजवावे लागते. हे आपण स्वतः समजायला नको? भले तुम्ही खूप समजावता पण त्यानंतर तरी ते समजतात ना?
प्रश्नकर्ता : हो समजतात.
दादाश्री : तर हा सर्वात चांगला मार्ग आहे. नाहीतर मारुन-मुटकून समजवायला जातात! कारण की बाप होऊन बसले आहेत ना, आणि ते समजतात की अजूनपर्यंत जगामध्ये कोणी बापच झाले नाही! म्हणून जे समजावून-उमजावून अशा प्रकारे वागतात, त्यांना मला अन-क्वॉलिफाइड नाही म्हणायचे.
वडीलांचा सद्-व्यवहार कसा असायला हवा? मुलांबरोबर दादागीरी तर नाहीच, परंतु सक्ती सुद्धा नको. त्यास वडील म्हणतात.
प्रश्नकर्ता : मुलगा त्रास देत असले तर? मुलगा त्रास देत असेल तर वडील म्हणून काय केले पाहिजे? तरी तेथे सक्तीने वागयला नको?