________________
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
त्याला घडवेल. मुलांना घडवण्यास जमत नाही तरी सुद्धा लोक घडवतच असतात ना? म्हणून तर चांगले घडवणे होत नाही. मुर्ति चांगली बनत नाही. नाक अडीच इंचाऐवजी साडे चार इंचाचे करुन टाकतात! नंतर मग मुलाची पत्नी येते, ती त्याच्या नाकाला कापून ठीक-ठाक करायला जाते. तेव्हा मुलगा पण तिचे नाक कापायला जातो. अशा प्रकारे मग ते दोघेही समोरासमोर येतात.
प्रश्नकर्ता : 'सर्टिफाइडट' फादर-मदर ची व्याख्या काय आहे?
दादाश्री : 'अन्सर्टिफाइडट' आई-वडील म्हणजे स्वत:चा मुलगा स्वतःच्या म्हणण्यानुसार वागत नाही, स्वत:चा मुलगा स्वत:च्या आईवडीलांचा आदर करत नाही, हैरान करतो! अशा आई-वडीलांना अन्सर्टिफाइड आई-वडील असेच बोलावे लागेल ना!
नाहीतर मुले अशी होतच नाहीत, मुले आज्ञाधारी असतात. परंतु आई-वडिलच धड नाहीत. जमीन अशी आहे, बीज असे आहे. म्हणून तर पीकात बरकत नाही! वरुन सांगतो की, 'माझी मुले महावीर होणार आहेत.' महावीर होतील का? महावीर ची आई तर कशी असावी!! वडील असातसा असला तरी चालेल, परंतु आई तर कशी असावी?!
यातील काही गोष्टी तुम्हाला आवडल्या?
प्रश्नकर्ता : ही गोष्ट आवडते त्यामुळेच तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय रहातच नाही.
दादाश्री : बरेच लोक मुलाला म्हणतात की, तू माझे सांगितलेले ऐकत नाही.' मी सांगितले, 'तुमची वाणी मुलाला आवडत नाही.' जर आवडली असती तर परिणमित झालीच असती. आणि वडील म्हणतात, 'तू माझे सांगितलेले ऐकत नाही.' अरे! तुला वडील होणे येत नाही. ह्या कलियुगात लोकांची स्थिती तर पहा! नाहीतर सत्युगात आई-वडील कसे होते!
मला हे शिकवायचे आहे की, तुम्ही अश्याप्रकारे बोला की मुलांना तुमच्या सांगण्यात इंटरेस्ट येईल. आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे करतीलच.