________________
१४
आई-वडील आणि मुलांचा व्यवहार
दादाश्री : मुले वडीलांमुळेच त्रास देतात. वडीलांमध्ये नालायकी असेल तरच मुले त्रास देतात. ह्या जगाचा कायदा असाच आहे! बापात बरकत नसेल तर मुले त्रास दिल्याशिवाय राहत नाही.
प्रश्नकर्ता : मुलगा वडीलांचे सांगितलेले ऐकत नसेल तर काय करायचे?
दादाश्री : 'आपली चूक आहे' असे समजून सोडून द्यायचे! आपली चूक आहे तेव्हाच ऐकत नाहीत ना! वडील होता आले असते तर स्वत:चा मुलगा स्वत:चे ऐकत नाही असे झाले असते का? परंतु वडील होता आलेच नाही ना!
प्रश्नकर्ता : एकदाचे वडील झाल्यावर मग पिल्ले (मुले) वडीलांना सोडतील का?
दादाश्री : सोडत असतील का? पिल्ले तर पूर्ण जीवनभर डॉग आणि डॉगीन ('कुत्रा' आणि 'कुत्री') दोघांकडे पाहातच असतात, की कुत्रा भो भो करतो आणि कुत्री त्याचे लचके तोडते. 'कुत्रा' भो भो केल्या शिवाय राहत नाही. पण शेवटी दोष त्या 'कुत्र्याचाच' निघतो. पिल्ले त्यांच्या आईच्याच बाजूने होतात. म्हणून मी एका माणसाला म्हणालो होतो, मोठी झाल्यावर ही मुले तुला मारतील, म्हणून बायकोबरोबर सरळ होऊन रहा! ही मुले तर त्यावेळी पाहातच असतात. त्यांची मजल पोहचत नाही तोपर्यंत आणि एकदा का त्यांनी मजल गाठली तर ते खोली बंद करुन मारतील. लोकांच्या बरोबर असे सुद्धा झाले आहे ! मुलाने त्या दिवसापासूनच मनात नक्की केलेले असते की मोठे झाल्यावर मी वडीलांना परतफेड करेल. माझे काहीही होवो, परंतु त्यांना धडा शिकवणारच असे ठरवतो. हे सर्व सुद्धा समजण्यासारखे आहे.
प्रश्नकर्ता : म्हणजे सगळा दोष हा वडीलांचाच?
दादाश्री : हो, वडीलांचाच! दोष वडीलांचाच आहे. वडीलांमध्ये वडील होण्याची पात्रता नसेल, तर त्याची पत्नी सुद्धा त्याच्या विरुद्ध वागते. वडीलांमध्ये तशी योग्यता नसल्यामुळेच असे घडते ना! ते तर मग कसे बसे करुन समजून घेता. खूप मुश्किलीने संसार गाडा चालवतात. कुठपर्यंत समाजाच्या भीतीने भीत राहणार?